🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा बिआरशाही : सभापती देसाई यांनी पुन्हा एकदा फडकवला शिवसेनेचा भगवा झेंडा...!


🌟शिवसेना महाविकास आघाडीला १८ पैकी १५ जागांवर मिळाला दणदणीत विजय🌟 


पुर्णा (दि.२९ एप्रिल) - पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत सभापती बि.आर.देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला असून विरोधकांना चारीमुंड्या चित्त करीत कृषी उत्पन्न बाजार समितीवर  बिआरशाही कायम ठेवत एकून १८ पैकी शिवसेना महाविकास आघाडीच्या जयभवानी शेतकरी महाविकास पॅनलचा १५ जागांवर दणदणीत विजय.

पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील दोन दशकापासून सभापती बि.आर.देसाई यांचे निर्विवाद वर्चस्व असून त्यांच्या या एकाधिकार वर्चस्वाला आव्हान देण्याचे काम विरोधकांकडून मागील दोन दशकांपासून केले जात होते परंतु सहकार क्षेत्रात अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या बि.आर.देसाई यांना धुळ चारणारा एकही मातब्बर राजकारणी अद्यापपर्यंत तालुक्यातच काय जिल्ह्यात देखील निर्माण झाला नाही अन् होणार ही नाही हे या पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकालावरून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत व्यापारी मतदार संघातून शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ.जयप्रकाश मोदाणी,दिपक लक्ष्मणराव बोबडे तर हमाल मापाडी मतदार संघातून माधव उत्तम नादरे,ग्रामपंचायत मतदार संघातून बोकारे अशोक कांचनबाई तर प्रथमच भाजपाकडून तिन उमेदवार विजयी झाले असून या विजयी उमेदवारांमध्ये बनसोडे यशोदाबाई पांडुरंग भाजप,गिताराम देसाई भाजप,दशरथ थोरात भाजप यांचा समावेश आहे तर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून शिवसेना महाविकास आघाडीचे) ओबीसी प्रवर्गातून नामदेव विठ्ठल ठाकूर,भटकेविमुक्त प्रवर्गातून बालाजी वैद्य महाविकास आघाडी,महीला राखीव प्रवर्गातून कमलाबाई रमेश काळबांडे,कलावंती रघुनाथ डाखोरे सर्वसाधारण प्रवर्गातून अमृत भुजंगराव कदम,खैरे बालाजी रामराव,ढोणे संतराम नागोराव,पारवे सुरजसिंग अच्युतराव,पिसाळ रुक्मिणीबाई मारोतराव मोरे,विक्रम मारोतराव लोखंडे,छबू श्रीराम आदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या