🌟कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त हभप.रामराव ढोक महाराज यांचे किर्तन....!


🌟भाविक भक्तांनी किर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे🌟

धारूर (प्रतिनिधी) :- कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.२१ एप्रिल रोजी ह.भ.प.गणेश महाराज वारंगे व दि.२२ एप्रिल ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

       परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.२ शके १९४५ शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शुक्रवार दि.२१ एप्रिल रोजी ह.भ.प.गणेश महाराज वारंगे (मादळमोहिकर) यांचे रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. शनिवार दि.२२ एप्रिल रोजी रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे.

        कांदेवाडी येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भुतपुर्व शाखाधिकारी शिवाजीराव खाडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळी, आंबेजोगाई, बीड,घाटनांदुर व धर्मापुरी शाखेच्या व्यवस्थापक पदी त्यांनी काम केले होते . सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. रामायणाचे ते गाढे अभ्यासक होते. कांदेवाडी येथील पहिले पदवीधर म्हणून त्यांची विशेष ओळख होती. धारूरसह परळी व परिसरात जुने ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणुन प्रसिध्द होते. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते.  तसेच धार्मिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रासह अन्य कार्यात अग्रेसर म्हणून धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तीमत्व म्हणून कै.शिवाजीराव खाडे यांचे ओळख होती.   

      कांदेवाडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक,सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच  परिसरातील भाविक भक्तांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी कांदेवाडी ता.धारूर (दिंद्रड येथून दक्षिणेस 5 किमी अंतरावर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू  प्रदिप शिवाजीराव खाडे (अध्यक्ष, कै.रामभाऊ आण्णा खाडे सेवाभावी संस्था, लातूर, अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कुमठा, तथा सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ), विलास शिवाजीराव खाडे, बालासाहेब शिवाजीराव खाडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या