🌟परभणी जिल्ह्यात सर्वत्र हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा....!


🌟श्री हनुमान मंदिरांमधून सकाळी 06-00 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा हजारो हनुमान भक्तांच्या हजेरीत साजरा🌟

परभणी (दि.06 एप्रिल) : परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आज गुरुवार दि.०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला श्री हनुमान मंदिरांमधून सकाळी 06-00 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा हजारो हनुमान भक्तांच्या हजेरीत हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

               परभणीतील देशमुख गल्लीतील मोठा मारोती मंदिर, रेल्वेस्टेशन परिसरातील पेडा हनुमान मंदिर, नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिर, शिवाजी चौक, गांधी पार्कातील हनुमान मंदिर तसेच सुभाषरोडवरील श्री बालाजी मंदिर व मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीतील हनुमान मंदिरांमधून पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, विधी पारंपारिक पध्दतीने पार पडले. पाठोपाठ ठिक 6 वाजता ‘पवनसुत हनुमान की जय’ या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जिल्ह्यात अन्यत्रसुध्दा या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचने, सप्ताह, महाप्रसादाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या