🌟पुर्णेत रमजान ईद उत्साहात साजरी : हजारो मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर केले सामुहीक नमाज पठन....!

🌟यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने सर्वांना सुख,शांती आणि समृद्धी मिळो अशी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली🌟


🌟शहरात रमजान ईद म.बसवेश्वर व भगवान परशुराम जयंती तसेच अक्षयतृतिया निमित्त सर्वधर्मिय बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा🌟 


पुर्णा (दि.२२ एप्रिल) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या आज शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी रमजान ईद दिनी शेवटचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी सकाळी पुर्णा शहरासह तालुक्यातील हजारो मुस्लीम समाज बांधवांनी शहरातील ईदगाह मैदानावर एकत्रित येवून जामा मस्जितचे पेशइमाम मौलाना शमीम रिझवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहीक नमाज अदा केली. 


यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी या सामुहीक नमाज पठन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने सर्वांना सुख,शांती आणि समृद्धी मिळो अशी अल्लाकडे (इश्वराकडे ) प्रार्थना करण्यात आली. यावेळी सर्वच स्थरातील नागरिकांनी नमाज पठण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला नमाज पठण नंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेटी घेण्यात आल्या यावेळी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी पुर्णा तहसिलचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी माधवराव बोथीकर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने उत्तम कांबळे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम,ॲड.हर्षवर्धन गायववाड हे आवर्जून उपस्थित होते.....  


🌟पुर्णा शहरात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन :-

मुस्लीम बांधवांच्या रमजान ईदसह आज लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्व यांची व भगवान परशुराम यांची जयंती तसेच हिंदुधर्मियांचा अत्यंत महत्वाचा सन अक्षयतृतिया असल्यामुळे शहरात आज सर्वधर्मिय समाज बांधव एकमेकांना शुभेच्छा देश एकमेकांच्या आदराने भेटीगाठी घेतांना पहावयास मिळाले हिंदु मुस्लीमांसह लिंगायत समाज बांधवांनी देखील राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत एकमेकांच्या आनंदात सहभाग नोंदवला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या