🌟परभणी जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस....!


🌟तर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरणासह हवेत गारवा🌟

परभणी (दि.०८ एप्रिल) : परभणी शहरासह जिल्ह्यात काही भागात आज शनिवार दि.०८ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

           वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणे शनिवारी सकाळी मानवत परिसरात वादळी वार्‍यांसह विजांचा कडकडा झाला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विजांच्या कडकटाडामुळे तालुक्यातील मांडे वडगाव येथील वयोवृध्द महिलेस जीव गमवावा लागला.

              मानवत तालुक्या पाठोपाठ पाथरी व सेलू तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. परभणी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी गार वारे वाहत होते. पाठोपाठ हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. सुमारे पंधरा ते वीस मिनीट मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता.

दरम्यान, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम तर काही भागात जोरदार पावसासह गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या