🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला,जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा गोप्यस्पोट🌟


✍️ मोहन चौकेकर

* राज्यातील बसपोर्ट एअरपोर्टप्रमाणे निर्माण करणार असून सुरुवात नागपूर पासून होणार; एकाच दिवशी 12 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

* सेतू बंधन प्रकल्पातून 3 वर्षात 100 रेल्वे पुलांच्या निर्मितीमुळे रेल्वे फाटक ही संकल्पना राज्यातून हद्दपार होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहीती

* महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेस अजित पवार उपस्थित राहणार की नाही यावरुन चर्चेला उधाण 

* जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस अपघात 13 जण ठार ;  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडुन कुटुंबांना 2 लाखांची मदत जाहीर  मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार

* जपानचे पंतप्रधान फुनिओ किशिदा यांच्यावर प्रचारादरम्यान फेकण्यात आला स्फोटक पदार्थ, जीवितहानी नाही; स्मोक किंवा पाईप बॉम्ब असल्याची माहीती

* सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना नव्याने सुरू होणार, शासन 20 ते 22 हजार कोटींचा निधी खर्च करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा गोप्यस्पोट

* आरपीआय आठवले गट कर्नाटक निवडणूक लढवणार, कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात 15 जागांवर आपले नशीब आजमावण्याची शक्यता

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61040 रुपये

* बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलीस वांद्रे स्थानकाबाहेर ठेवणार पाळत

* पुलवामा हल्लाबाबत सत्यपाल मलिकांनी केलेल्या गौप्यस्फोटाची शहानिशा करणे गरजेचे - छगन भुजबळ

* समलैंगिक विवाहासंदर्भातील याचिकांवर पाच न्यायाधीशांचे घटनापीठ 18 एप्रिलपासून करणार सुनावणी

* राहुल गांधींनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी माफी मागावी,चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य

* शाहजहांपूर रस्ता अपघातात महिला आणि मुलांसह 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक

* कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे तिकीट,तिसरी यादी जाहीर

* सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर यांच्यातच युद्ध सुरु झाले; भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश

* आप्पासाहेब धर्माधिकारींना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार, २० लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहणार 

* बिहारमध्ये शिक्षकांची २ लाख २५७ जागांसाठी लोकसेवा आयोगामार्फत मेगाभरती*

* प्राथमिक ८०,२५७, माध्यमिक व उच्च माध्यमिक १,२०,०००

* बिहारसारखे राज्य लोकसेवा आयोग सक्षम करून एवढी मोठी भरती प्रक्रिया राबवत असेल तर महाराष्ट्रात का नाही?

* केंद्र सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचा मोठा गौफ्यस्फोट*

* सरकारच्या चुकीमुळे हमला झाला. एअरक्राफ्ट केल असत तर हा हमला झाला नसता. पंतप्रधान मोदी, अजित डोवाल यांनी शांत राहायला सांगितलं असे भाजपचे ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक एका मुलाखतीत म्हणाले.

* सरकारच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे, संजय राऊत यांची  मागणी

* भारत-पाकिस्तानसारखा मुद्दा उपस्थित करायचा आणि निवडणुका जिंकायच्या. 2019 च्या निवडणुकांपूर्वी पुलवामामध्ये झालेला हल्ला राजकारणासाठी घडवून आणला गेला होता का? या हल्ल्यात काहीतरी गडबड घोटाळा आहे, या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. 

* बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून एका वर्षात सात हजार चमचे चोरीला गेल्याची तक्रार कंत्राटदाराने केली*

* जेवणाची ताटे, ग्लास, नाष्टा प्लेट अधिकारी, कर्मचारी ऑफिसमध्ये घेऊन जातात

* BMC सारख्या प्रतिष्ठीत पालिकेत असा प्रकार अशोभनीय, निंदनीय, लज्जास्पद...!

* हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार केंद्रीय निमलष्करी दलाच्या परिक्षा

* गृह मंत्रालयानं केंद्रीय निमलष्करी दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. 

* IPL: दिल्ली कॅपिटल्सचा 24 धावांनी पराभव, मनिष पांडेचं अर्धशतक व्यर्थ; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिले होते 175 धावांचे आव्हान

* मुंबई महानगर पालिकेचा 900 कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेने दहिसरमध्ये 900 कोटी रुपयांचा केला जमीन घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप

* कर्नाटक विधानसभा निवडणूक: काँग्रेसची 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; 124 उमेदवारांची पहिली यादी तर 42 उमेदवारांची दुसरी यादी यापूर्वीच जाहीर

* मराठवाड्यात पाणीटंचाई:  मराठवाड्यात जून आणि जुलै महिन्यात 5 हजार 386 गावं, वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता; प्रशासनाने 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा केला तयार 

* 'बलोच' चित्रपटाचा धमाकेदार टीझर : बहुचर्चित 'बलोच' या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता प्रवीण तरडे, अशोक समर्थ यांचा हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज होणार

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61040 रुपये

 ✍️मोहन चौकेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या