🌟परभणीत समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान....!


🌟दोन रुग्णांसाठी रोहित नाईकनवरे व शेख महेबूब शेख अजीज यांनी मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले🌟

परभणी (दि.02 मार्च) - परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य, रुग्णहितार्थ निःस्वार्थ कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने आज दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या दोन गरजू रुग्णांसाठी रोहित नाईकनवरे व शेख महेबूब शेख अजीज यांनी मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे. 

       गरजू रुग्णांना वेळेवर रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल रोहित नाईकनवरे व शेख महेबूब शेख अजीज यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले. त्याच बरोबर रुग्णाचे नातेवाईक  नागसेन साळवे, बी.आर. साळवे, गंगाधर साळवे, गुलाब घनसावंत, शेख मकसूद भई  यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे आभार मानले. 

     यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, उपाध्यक्ष आकाश साखरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेख अझर, सामाजिक कार्यकर्ते हरदिप सिंग बावरी, सहसचिव अजय शिराळे, शंकर बनसोडे, अहेमद शेख, सचिन जंगम, आदी उपस्थित होते. 

       त्याच बरोबर ब्लड बँक कर्मचारी डॉ राठोड मॅडम, दीपक कंडेरे, किशोर जाधव, हमीद सिद्दीकी, अनिल सावंत, विठ्ठल शिंदे, माधव गोचडे, अतुल जाधव, प्रीतम साहेब,आत्माराम जटाळे, प्रीतम साहेब, मारोती क्षिरजवार, अशोक अंभोरे यांचेही विशेष सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या