🌟खवणे पिंपरी येथील बिबट मृत्यू प्रकरण🌟
परभणी (दि.३० एप्रिल) :- खवणे पिंपरी येथील बिबट मृत्यू प्रकरणातील दोन आरोपींना प्रथमश्रेणी फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांनी पाच दिवसांची वनकोठडी मंजूर केली.
सेलू येथील फौजदारी न्यायालयात वन गुन्हा क्रं. ०१/२०२३-२४ दिनांक २९ एप्रिल २०२३ नुसार बिबट व इतर वन्यजीव यांची शिकार करण्यात आली होती. ही अवैधरित्या तस्करी करणारे आरोपी साईनाथ प्रकाश धोत्रे (२८) रा. रेणाखळी ता. पाथरी जि.परभणी आणि सुनिल अंकुश घोडे (२६) रा. खवणे पिंपरी ता. सेलू यांना मा. न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी युक्तिवाद ऐकल्यानंतर वन्यजीव तस्करीमधील समाविष्ट इतर आरोपी, सहका-यांचा छडा लावण्यासाठी व अवैधरित्या वन्यजीव तस्करीची साखळी उघड करण्याकामी सखोल चौकशीसाठी वन विभागाने वनकोठडीची मागणी केली. त्यांची ही मागणी मान्य करत आरोपींना पाच दिवसाची वनकोठडी मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकरणात विभागीय वन अधिकारी अरविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ञृषिकेश चव्हाण हे तपास करत आहेत.....
0 टिप्पण्या