💥या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥
पुर्णा (दि.१० एप्रिल) - पुर्णा पोलिस प्रशासनाकडून आज सोमवार दि.१० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास पुर्णा नगर परिषदेतील राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा, गावडे साहेब तसेच उपविभागीय अधिकारी गंगाखेड मा श्री पाटील यांची या शांतता बैठकीमध्ये उपस्थित लाभली असून ही बैठक पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. सुभाषचंद्र मारकड यांच्या नियोजन पूर्ण उपस्थिती मध्ये पूर्णा नगर परिषदेतील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पूर्णा शहरात शांतता व कायद्या सुव्यवस्था राहण्यासाठी व जयंती मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता हि बैठक घेण्यात आली आहे तर या सार्वजनिक जयंती उत्सवा निमित्त पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे तसेच पूर्णा शहरात जागोजागी जे घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य होत आहे हे स्वच्छ व सुशोभिकरण करण्यात यावे तसेच जयंती उत्सवाच्या दिवशी मिरवणुकीचा मार्ग मोकळ्या करण्यात यावा जेणेकरून मिरवणुक जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही अशी सूचना नगर परिषद च्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे या बैठकीस जयंतीचे मार्गदर्शक भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो ( महासचिव, अ.भा.भी. संघ महाराष्ट्र प्रदेश ) जयंतीचे अध्यक्ष भंते पय्यावंश, प्रकाश दादा कांबळे, ( ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत ),मा. उत्तम भैया खंदारे मा. उपनगराध्यक्ष न.प. पूर्णा मा. अॅड. हर्षवर्धन गायकवाड मा. नगरसेवक न.प पूर्णा, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. विशाल कदम, मा.वीरेश कसबे मा नगरसेवक न.प. पूर्णा, तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी, सर्व शांतता समिती सदस्य ज्येष्ठ पत्रकार नागरिका पोलीस पाटील व सर्व मंडळाचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
0 टिप्पण्या