🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का ; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा गंभीर आरोप करत राजीनामा🌟

✍️मोहन चौकेकर                             

* महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित 13 श्रीसेवक / नागरिकांचा उष्माघातामुळे मुत्यु; हजारो नागरिकांना उष्माघाताचा त्रास.

* माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या पुण्यातील अनेक नियोजित कार्यक्रमास अनुपस्थित ; त्यामुळे अजित पवार भाजपामध्ये जाणार या चर्चानां उधाण 

* श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक, यावर कोणीही राजकारण करू नये; उष्माघात मृत्यू प्रकरणावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया

* नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अण्णा हजारे यांचं नवं आंदोलन, राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यातून तेल निर्मिती प्रकल्प सुरु 

* राज्यातून एनए टॅक्स रद्द करणार, खरेदीदारांना फक्त मालमत्ता खरेदी करतानाच अकृषी कर (एनए टॅक्स) आकारला जाणार त्यानंतर अकृषी कर भरण्याची गरज नाही --- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

* नाशिकमध्ये पिकांसह पाऊस व गारपिटीने पशुधनाचे नुकसान, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज पडून 16 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर

* श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर येणार बायोपिक, अभिनेता मधुर मित्तल साकारणार भूमिका

* आता सर्वोच्च न्यायालयातील जमादार पदांवरील कर्मचाऱ्यांना सुपरवायझर संबोधलं जाणार, CJI चंद्रचूड यांचा निर्णय; नवे नियम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रेणीच्या पदांना लागू होणार

* घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये 1.34 टक्क्यांवर, वाणिज्य मंत्रालयाची माहिती.

* आयटी कंपनी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मिळणार 12 ते 15 टक्के पगारवाढ

* SC ने मुंबई मेट्रोला आरेच्या जंगलातून 177 झाडे काढण्याची दिली परवानगी.

* गरीबीतून वर आला अन् आता IPL ची सर्व कमाई गरीब मुलांसाठी खर्च करणार ; रिंकू सिंगचा निर्णय

* पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा.

* अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू; भाविक ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करू शकतात रजिस्ट्रेशन

* होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना.

* मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का ; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा गंभीर आरोप करत राजीनामा.

* १४ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अग्नीसुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार

* सरकारच्या राजकारणामुळे निष्पापांचा बळी गेला खा.संजय राऊत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी घ्यायला गृहमंत्री अमित शहा यांना वेळ नव्हता म्हणून दुपारी आयोजित करण्यात आला. व्हीआयपी छपराखाली होते आणि आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात होते. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. सरकारच्या राजकारणामुळे निष्पापांचा बळी गेला. खा.संजय राऊत

* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर, प्रशांत दामले यांचे वर्चस्व सिद्ध प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समुह पॅनल'ने १० पैकी ८ जागा जिंकल्या.प्रसाद कांबळी यांच्या 'आपला पॅनल'ने १० पैकी २ जागा जिंकल्या.

* मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला झटका ठाकरे गटाची बीएमसी प्रभाग रचनेवरील याचिका फेटाळली : ठाकरे गटाची याचिका फेटाळत शिंदे - फडणवीस यांचा निर्णय कायम. मुंबई महापालिकेतील 227 ची प्रभाग रचना कायम राहणार.

* आरे मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा संताप : मुंबई मेट्रोरेल प्राधिकरणाला 10 लाखांचा दंड,मनमानी कारभारावर सरन्यायाधीशांची तीव्र नाराजी केवळ 84 झाडं तोडण्याची परवानगी दिलेली असताना 177 झाडं तोडायची परवानगी मागताच कशी ? सरन्यायाधीशांचा सवाल,

* परवानगी देणाऱ्या पालिकेवरही कोर्टाची नाराजी : आमच्या आदेशांच्या वर जात पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीनं अतिरिक्त वृक्षतोडीची परवानगी दिलीच कशी ? सरन्यायाधीशांनी सुनावले खडे बोल.

* प्राधिकरणान दंडाची रक्कम वन विभागाकडे जमा करावी, आयआयटी पवईला जागेची पाहाणी करून अहवाल देण्याचे निर्देश

*१२ विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण लांबणीवर : सुप्रीम कोर्टानं ४ आठवड्यानंतर ठेवली सुनावणी. मे महिन्यात होणार सुनावणी.

* निवृत्तीबाबत धोनीचे संकेत! निवृत्तीबाबत धोनीचा खुलासा - निर्णय घेण्यासाठी खूप वेळ आहे, जर मी आता बोललो तर कोच दबावात येतील

* शेअर बाजार: सेन्सेक्समध्ये 520 अंकांची घसरण होऊन 59,910.75 वर बंद तर निफ्टीत 121 अंकांची घसरण होऊन 17,706.85 वर बंद

* भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार? एका यूट्यूब चॅनेलने व्हिडिओच्या माध्यमातून पसरवली अफवा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण.

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55940 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61030 रुपये,

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या