🌟बिडच्या विभागीय अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - संदीप काळे


🌟परभणी येथे व्हॉईस ऑफ मिडीयाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न🌟


परभणी (दि.१५ एप्रिल) : व्हॉईस ऑफ मिडीयाचे बीड येथे मराठवाडा विभागीय अधिवेशन दि.३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पत्रकारांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अधिवेशनास व्हॉईस ऑफ मिडीयाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले आहे.


व्हॉईस ऑफ मिडीयाची जिल्हास्तरीय बैठक शनिवार, दि.१५ एप्रिल रोजी व्यंकटेश मंगल कार्यालय, एमआयडीसी, परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सहसरचिटणीस ज्ञानेश्वर भाले होते. यावेळी संघटनेचे राज्य कार्यवाह सुरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, सरचिटणीस श्रीकांत देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी, शहराध्यक्ष अक्षय मुंडे, साप्ताहीक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन, साप्ताहीक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा आदींची उपस्थिती होती. या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या भोसले, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे आदिंची ऑनलाईन उपस्थिती होती.


पुढे बोलताना श्री.काळे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मिडीया संघटना पत्रकारांसाठी कृतिशील कार्यक्रम करणारी संघटना आहे. पत्रकांराना पेंशन, स्वत:ची घरे, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण आदी प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बीड येथील अधिवेशनात पत्रकारांच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार असल्याची श्री.काळे यांनी सांगितले. यावेळी दिव्या भोसले, बालाजी मारगुडे, ज्ञानेश्वर भाले, विजय चोरडीरया, सुरज कदम, गजानन देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले. 

यावेळी संघटनेत नव्याने नियुक्त झालेले मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांचे पुष्पहार घालून संघटनेत स्वागत करण्यात आले. यावेळी संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल सर्व तालुकाध्यक्षांचा देखील सत्कार करण्यात आला बैठकीच्या यशस्वितेसाठी शिवाजी वाघमारे, बाळासाहेब काळे, अमोल लंगर, गणेश लोखंडे, सुधीर बोर्डे, मंदार कुलकर्णी, शेख मुबारक, विष्णू सायगुंडे आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या