🌟पुर्णा शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद....!


🌟श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आज ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान🌟


पुर्णा (दि.१८ एप्रिल) - पुर्णा शहरातील अमृत नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आज मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व मोफत थायरॉईड तपासणी (Thyroid test) आणि सिबीसी (CBC test) तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. 


 रुग्णालयामध्ये ज्या वेळी रुग्णांना रक्त लागते आणि हव्या असलेल्या गटाचे रक्त मिळत नाही त्या वेळी आपल्याला रक्तदानाचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळते. ज्यावर अशी वेळ आलेली नसते त्यांना रक्तदानाचे महत्त्व जाणवणार नाही. हे जरी खरे असले तरी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सार्‍यांनाच शस्त्रक्रियेसाठी रक्त लागेल हे वास्तव आहे त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जोपासत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आज ५५ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.


रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या संकल्पनेतून श्री.स्वामी समर्थ केद्राच्या वतीने तब्बल ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्ता अभावी त्रासलेल्या व्यक्तींना जीवनदान द्यावे या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान केले.....


[श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करताना पुर्णा तहसिलचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,शिवशरण शिराळे व सोबत इतर स्वामी भक्त...]


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या