🌟सेलू येथे प्रवेश पुर्व नोंदणी अर्ज या शैक्षणीक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश नोंदणी चालू करण्यात आली🌟
सेलू (दि.१० एप्रिल) - येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार ४ मधील मुलींचे शासकीय वसतीगृह सेलू येथे प्रवेश पुर्व नोंदणी अर्ज या शैक्षणीक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश नोंदणी चालू करण्यात आली आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी पुढील निकषांच्या आधारे प्रवेश नोंदणी शैक्षणीक वर्ष २०२३-२४ साठी चालू करण्यात आली आहे.शिक्षण विभाग जिल्हा परीषद परभणी यांच्या अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (प्रकार 4) मुलींचे शासकीय वसतिगृह सेलू येथे दर्जेदार सुविधा विद्यार्थिनींना देण्यात येतात.
* निकष पात्र विद्यार्थिनींकडून :-
दिनांक १/४/२०२३ ते. १०/६/२०२३ पर्यंत नोंदणी अर्जं स्वीकारण्यात येत आहेत. यावेळी नोंदणी सोबत आवश्यक ते निकषपात्र कागद पत्रे जोडणे बंधनकारक आहे.याची सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
* प्रवेशासाठी पात्रता /निकष पुढील प्रमाणे आहे :-
अनाथ मुली,एकल पालक हयात (आई किंवा वडील ) असलेल्या, दिव्यांग असलेल्या पालकांचे पाल्य , नैसर्गिक आपत्ती ग्रस्त पाल्य,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या मुली, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या मुली,अल्प संख्याक संवर्गातील मुली,इतर मागास प्रवर्गातील मुली, दारिद्र्य रेषेखालील मुली , गावापासून ५ किमि. पर्यंत शिक्षणाची सोय नाही अशा मुली , कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार १ मधील ८वी पास व १० वी उत्तीर्ण मुली,गुणवत्ता आणि निकषा नुसार या प्रकारे प्रवेशासाठी निकष ठरविण्यात आले आहेत.
या शासकीय वसतीगृहातील सोयी सुविधा पुढील प्रमाणे आहेत,निवासाची मोफत व्यवस्था ,स्वतंत्र प्रशस्त इमारत व खोल्या, दर्जेदार मोफत जेवण,स्वतंत्र बेड , टेबल, खुर्ची सह सर्व अद्ययावत भौतिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.तेव्हा संबधित सर्व पात्र गरजू पालकांनी व विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या सुविधांचा लाभ घेऊन मुलीच्या शिक्षणात पुढाकार घ्यावा असे आवाहन अध्यक्ष तथा तहसिलदार दिनेश झाम्पले,सचिव तथा गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,गृहप्रमुख मीना मावरे आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या