🌟पुर्णेत श्री.स्वामी समर्थ केंद्रातर्फे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन....!


🌟श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर दि.११ एप्रिल ते दि.१८ एप्रिल अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.०९ एप्रिल) - पुर्णा शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे आज रविवार दि.०९ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी दि.9 एप्रिल दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील पालखी सोहळ्यास अमृत नगर येथून सुरुवात होणार असून भव्य पालखी सोहळा आनंद नगर,विर सावरकर चौक ,महात्मा बसवेश्वर चौक,शिवतीर्थ,मुख्य बाजार, सराफा,महादेव मंदिर मार्गे श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान येथे विसर्जीत होणार आहे.


या भव्य पालखी सोहळ्यासह श्री स्वामी समर्थ केंद्र अमृत नगर  येथे  दि.११ एप्रिल  ते दि.१८ एप्रिल २०२३ दरम्यान श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे.सप्ताह काळात आरती,नैवैद्य, गुरुचरित्र वाचन, विविध याग आदी कार्यक्रम होणार आहेत.       

 या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्या असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या