🌟परभणी येथे खुल्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभाचे 19 एप्रिल रोजी आयोजन.....!


🌟या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारे असणार आहेत🌟

परभणी (दि.17 एप्रिल) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व माता रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृह परभणी वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ईश्वरी ई सेवा केंद्र यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ दिनांक 19 एप्रिल रोजी समाजहित अभियान प्रतिष्ठानचे राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठान कार्यालय, डॉ.आंबेडकर नगर जिंतूर रोड परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती घुगे मॅडम, समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी पोलिस निरीक्षक कोतवाली पोलिस स्टेशन नवा मोंढा परभणी, मा.रेंगे मुख्याध्यापक, म. फुले विद्यालय, परभणी, मा. रोहिदास अण्णा नेटके, अध्यक्ष, बाजार समिती, हमाल युनियन, नवा मोंढा परभणी,  मा. शेषेराव साळवे, सचिव, बाजार समिती, हमाल युनियन, नवा मोंढा परभणी, ॲड. सुभाष अंभोरे, दुधगांवकर, अध्यक्ष, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी आदींची असणार आहे. तरी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, आय.टी.आय. कॉर्नर, डॉ. आंबेडकर नगर, जिंतूर रोड, परभणी येथे ठीक दुपारी तीन वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य समन्वयक प्रमोद अंभोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या