🌟परळीत परस्पर 10 लाखांचे वाहन कर्ज उचलले : शहर पोलिस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल....!


🌟घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कस्तुरे हे करीत आहेत🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील कंडाक्टर कॉलनी येथील रहिवासी दादाराव संभाजी मुंडे व त्यांचा मुलगा डॉ.मनोज मुंडे यांच्या नावावर परस्पर 10 लाख रुपयांचे कर्ज उचलल्या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की,परळी शहरातील कंडाक्टर कॉलनी भागातील रहिवासी दादाराव संभाजीराव मुंडे यांना त्यांच्याच नात्यातील शिवाजीराव गित्ते,गोविंद गित्ते यांनी वाहन खरेदी करावयाचे असुन तुमची जामीनदार म्हणुन सही हवी असल्याचे सांगुन वरील दोघे व छत्रपती राजर्षी शाहु बॅंकेचे परळी शाखाधिकारी भागवत कंठाळे यांनी कोर्या कागदावर सह्या घेवुन दि.25 मार्च 2016 ते 4 एप्रिल 2016 दरम्यान संगनमत करुन परस्पर वाहन कर्ज उचलले ही बाब दादाराव मुंडे यांना 24 एप्रिल 2017 रोजी बॅंकेची नोटीस मिळाल्यानंतर लक्षात आली.यानंतर त्यांनी चौकशी केली असता आम्ही ते कर्ज भरु तुम्हाला कसलाही त्रास होणार नसल्याचे सांगण्यात आले.यानंतर 19 नोव्हेंबर रोजी चौकशी केली असता दादाराव मुंडे व डॉ.मनोज मुंडे जामीनदार असलेली शिवाजीराव गित्ते यांची वाहन कर्ज उचल करुन 10 लाख रुपये वाहन कर्ज केले या कर्ज प्रकरणात शिवाजी गित्ते व डॉ.अंकुश जब्दे यांच्या जामीनदार म्हणुन स्वाक्षर्या आहेत.हे सर्व कर्ज संगनमत करुन परस्पर उचलले.याबाबत दादाराव मुंडे यांनी बॅंकेतुन माहिती मिळविल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.यानंतरही आम्ही ते कर्ज भरुत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही असे सांगीतले.संबंधीत व्यक्ती नात्यातील असल्याने वाट बघितली परंतु बॅंकेच्या नोटीस येत असल्याने दादाराव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीराव गित्ते,गोविंद गित्ते,अंकुश जब्दे,भागवत कंठाळे,छत्रपती राजर्षी शाहु बॅंकेचे लिपिक,हिशोबनीस या सहा जणांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 420,409,464 ,465,467, 468,471,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कस्तुरे हे करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या