🌟परभणीत शांतीदुतच्या वतीने ईद निमित्य 101 गरजू कुटुंबियांना साड्यांचे वाटप....!


🌟पुणे स्थागुशाचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया व पोलीस अधिक्षक रागसुधा आर यांच्या हस्ते करण्यात आले वाटप🌟    

परभणी (दि.15 एप्रिल) - येथील शांतिदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने ईद निमित्य 101 गरजू गरीब मुस्लिम समाजातील कुटूंबियांना साडयांचे वाटप पुणे येथील गुन्हे अनवेशन शाखेचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया आणि परभणीचे पोलीस अधिक्षका रागसुधा आर यांच्या हस्ते करण्यात आले.  


      
या कार्यक्रमाच्या आदयक्षस्थानी शांतिदुतचे अदयक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश भुतडा,भीमराव शिंगाडे,सूरज कदम,प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ . रितेश अग्रवाल, राकेश खुराणा,गोविंद शर्मा, सौ.वर्षा सारडा ,गोविंद पुरोहित, सुनील पहेलानी आदी उपस्थित होते.या वेळी बोलताना पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ईद निमित्य शांतिदुत  मुस्लिम समाजातील गरीब गरजू ना साड्या वाटप करून  नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा घरी ईद साजरा करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार भाईचारा निर्माण करणारा आहे असे मत व्यक्त केले तर पोलीस अधीक्षका रागसुधा आर यांनीही शांतिदुतच्या या उपक्रमाचे कौतुक केले . या वेळी 101 गरजू  महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्यामसुंदर सारडा , सेजल सारडा ,शोयब  चाऊस यांनी विशेष परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या