🌟युडीआयडी अभियानांतर्गत ‘100 दिवस दिव्यांगांसाठी’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांकडे वैश्‍विक ओळखपत्र असणे आवश्यक🌟

परभणी,दि.20(प्र) : युडीआयडी अभियानांतर्गत ‘100 दिवस दिव्यांगांसाठी या विशेष अभियानास’ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

               दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांकडे वैश्‍विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ज्या दिव्यांगांकडे वैश्‍विक ओळखपत्र नाही त्यांना ओळखपत्र मिळवून देण्याकरीता जिल्ह्यात 100 दिवसांसाठी एक विशेष अभियान सुरु केले आहे. 1 एप्रिल पासून सुरु केलेल्या या अभियानात जिल्हा रुग्णालयात अस्थिव्यंग, भिषक, कान, नाक, घसा, मनोविकार, नेत्र, बालरोग, बहुविकलांग या प्रकाराच्या दिव्यांगांसाठी दररोज, तसेच गंगाखेड व सेलू येथील  उपजिल्हा रुग्णालय व जिंतूरातील ग्रामीण रुग्णालयात अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात येण्याकरीता लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करुनच शिबीरास हजेरी लावणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी व लाभार्थ्यांना नियोजित दिवशी शिबीरात उपस्थित राहण्याकरीता संबंधित गावचे ग्रामसेवक हे लाभार्थ्यांना सहकार्य करणार आहेत.

               दरम्यान, 1 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान या अभियानातून 350 दिव्यांगांची आर्थो, 70 लाभार्थ्यांनी भिषक, 90 लाभार्थ्यांची कान, नाक, घसा, 40 लाभार्थ्यांची मनोविकार, 95 लाभार्थ्यांची नेत्र, 21 लाभार्थ्यांची बालरोग तपासणी करण्यात आली. तसेच सेलूत 384, गंगाखेडात 320 तर जिंतूरात 360 असे एकूण या दिवसात 1 हजार 730 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या