🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न....!


🌟कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 🌟


पुर्णा (दि.३० मार्च) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या “स्पंदन” वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित‎ मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम,कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे,सचिव अमृतराज कदम,सहसचिव गोविंदराव कदम, प्रमुख वक्ते म्हणून विश्वाधार देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. राजकुमार,उपप्राचार्य डॉ.संजय दळवी, श्रीमती फातेमा शेख, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी,पर्यवेक्षक अनुशालव शेजूळ, पर्यवेक्षक शेख एस. टी. कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार, स्नेह-सम्मेलन प्रभारी डॉ.विजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. “स्पंदन २०२२-२३” स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी करताना महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध क्रीड़ा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आल्याचे माहिती दिली. यश संपादन केलेल्या विदयार्थ्यांचे केले अभिनंदन करत. कोरोना काळातील परिस्थितीमुळे विदयार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत नव्हत तसेच शैक्षणिक नुकसान झाल्याचे त्यांनी व्यक्त केले.  प्रमुख पाहुणे मा. डॉ. श्री विश्वाधार देशमुख यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या आम्ही तुफानातले दिवे या गीतामधून खूप काही घेण्यासारखं आहे. 

यावेळी विद्यार्थ्यांना वैचारिक चळवळी बाबत विविध उदाहरणे दिली.त्याच बरोबर आजचा युवक मोबाईलच्या टचसक्रीनमध्ये गुंतून शेतात राबराबणाऱ्या आई वडिलांच्या स्किनला टच करण्याचे विसरून गेला आहे यांची खंत त्यांनी व्यक्त केली.ग्रामीण भागातील मुल -मुली  शिक्षण‎ घेत पुढे येऊन विविध क्षेत्रांत भरारी‎ घेतली पाहिजे. मुलांच्या सुप्त गुणांना‎ वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे‎ उत्तम व्यासपीठ असल्याचे‎ प्रतिपादन त्यांनी केले.ग्रामीण भागातील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय विदयार्थ्यांच्या कला गुणाचा विकास करणारे ज्ञानमंदिर असून संस्थाचालकांच्या पुण्याईमुळे विदयार्थ्यांचें जीवन संपूर्ण झाल्याचे त्यांनी म्हंटले. “स्पंदन” स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना वितरित करण्यात आले. मा उत्तमराव कदम यांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव मा. श्री अमृतराज कदम यांनी म्हटले कि आज ज्या विदयार्थ्यांना बक्षीस मिळालेले आहेत नक्कीच उद्याच्या उज्ज्वल यशस्वी जीवनाची सुरुवात असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्यंकट कदम यांनी केले तर आभार डॉ. विजय पवार यांनी मानले. वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या