🌟ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ.....!


🌟प्रस्ताव कामाच्या अंदाजपत्रकासह कार्यालयात १५ मार्च पुर्वी सादर करण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.०३ मार्च) : ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार सन २०२२-२३ साठीचे (जिल्हा व राज्य) प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

तरी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायतनिहाय नमूद विविध कामांपैकी आर्थिक मर्यादेच्या अनुषंगाने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विविध कामांचे प्रस्ताव तयार करावेत. हे प्रस्ताव कामाच्या अंदाजपत्रकासह प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी १५ मार्चपूर्वी सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी केले आहे.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या