🌟अनाथ विद्यार्थ्यांनी वार्षिक बाविस हजाराच्या बालसंगोपन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा - आ.मेघनाताई बोर्डिकर


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक बाविस हजारांपर्यंत वाढवली 🌟


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१४ मार्च) - अनाथ विद्यार्थ्यांच्या  शिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक बाविस हजाराची"बालसंगोपन "शिष्यवृत्ती रकमेची घोषणा करून तात्काळ याच वर्षांपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.मेघनाताई बोर्डिकर यांनी केले आहे दीन दुबळ्यांचे कैवारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचे आ.मेघनाताई बोर्डिकर यांनी जाहीर आभार मानले यावेळी" अनाथांचे नाथ -एकनाथ "अशा घोषणाही देण्यात आल्या.

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आई /वडिलांचे छत्र हरवलेल्या , विधवा/ विदूर , घटस्फोटीता , परित्यक्ता, ज्याच्या पालकांना दुर्धर आजार आहे, अशी बालके कैध्यांची बालके , तसेच कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली बालके यांच्या शिक्षणासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालसंगोपन योजनेद्वारे सन २००५ पासून बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत बालक अठरा वर्षाचा होईपर्यंत त्यास वार्षिक अकरा हजार रुपये दिलें जात होते परंतु शिंदे सरकारने या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक बाविस हजारांपर्यंत वाढवली आहे.

🌟आवश्यक कागदपत्रे :-

" या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आवश्यक आहे.यात रहीवाशी प्रमाणपत्र , उत्पन्नाचे प्रमाणपत्र , विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र , आई / वडिलांचे म्रत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट पत्र , किंवा परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त प्रमाणपत्र , किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण सुरू असल्याचे कागदपत्र, बैंक पासबुक छायाप्रत, बालकांचे छायाचित्र आवश्यक आहे.

जिंतूर शहरातून एम.के.कादरी यांनी पंधरा दिवसांत बावन्न अनाथ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून आई व बालकांसोबत महिला व बालविकास विभागाच्या परभणी कार्यालयात दाखल करण्यात सहकार्य केले.किमान शंभर अनाथांना या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे.या प्रस्तावाच्या मार्गदर्शनासाठी एम.के.कादरी वरूड वेस जिंतूर येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे महीला व बालविकास समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी आत्मियतेने, तत्परतेने अनाथांची सेवा,सहकार्य करीत असल्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या