🌟भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी अक्षय सूर्यवंशी यांची निवड....!


🌟10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन🌟



जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनिक जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत  दि.१४ मार्च २०२३ रोजी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डि.के टोमके यांच्यासह  माजी समिती अध्यक्ष गुनिरत्न वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अक्षय सूर्यवंशी यांची तर उपाध्यक्षपदी राधे काकडे व प्रकाश वाव्हळे, सचिव पदी सुमेध सूर्यवंशी व कर्मवीर घनसावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांच्यासह सर्व कार्यकारिणीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळा जिंतूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. असा संकल्प जिंतूर येथील सार्वजनिक जयंती समितीने केला आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे: कोषाध्यक्ष  ऑड. स्वप्नील पवळे, सचिन  गजभारे व दीपक निकाळजे, सहसचिव गणेश काकडे, प्रकाश नवसागर, प्रकाश भिसे सहकोषाध्यक्ष रमेश काकडे, प्रवीण अंभोरे, संघर्ष चव्हाण, सम्राट सूर्यवंशी,  कार्याध्यक्षपदी अशोक वाकळे, आशिष तुरुकमाने, अनंता वाकळे सहकार्याध्यक्षपदी पप्पू उबाळे, अशोक भोसले, वैभव खंदारे व पवन अंभोरे  तर स्वागताध्यक्षपदी संजय (बंटी) भैया निकाळजे, ऑड. चंद्रकांत बहिरट, नगरसेविका आशाताई रामराव उबाळे यांची निवड करण्यात आली....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या