🌟जिंतूर तालुक्यातील बामणी जवळील करंजी फाटा जवळ बस ऊलटुन झाला अपघात सात प्रवासी जखमी....!


🌟अपघातात सहा किरकोळ तर एकजन गंभीर🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील बामणी जवळील करंजी फाटा येथे 40 प्रवासी घेऊन जिंतूर कडे जाणारी बस अचानक पलटी झाल्याने या अपघातात सात जण जखमी झाले यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास परभणी जिल्हा रुग्णालयात हलवले असून यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र बस आगारचा एक लाखाच्या वर बसचा नुकसान झाल्याचे माहिती मिळत आहे.

 याबाबत घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांकडून मिळालेल्या अधिक वृत्त असे की जिंतूर आगाराची बस सायखेडा हलटींग बस क्रमांक एम एच 20 बि.एल.0161 ही बस दि.8 मार्च, सकाळी 7 च्या सुमारास बस ड्रायव्हर बाळराज शेळके,कंन्डक्टर दत्तात्रेय कापुरे हे बस घेऊन सायखेडा ते जिंतूर कडे 40 प्रवासी घेऊन निघाली असता करंजी फाटा जवळ बसचा अपघात झाला सदर बस पलटी होत एका लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली यामध्ये सात प्रवासी जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी बामणी पोलीसांना देताच पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांच्या मदतीने बस मधील जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जख्मी शोभाबाई चव्हाण वय 65 वर्ष रा.संवगी, लक्ष्मी चव्हाण वय 45 वर्ष रा.लिंबा,बन्सी राठोड वय 78 वर्ष दहीफळ घंदारे ता.मंठा, आसाराम पाईकराव वय 60 वर्ष रा.उम्ररद, विष्णू रामदास राठोड वय 40 वर्ष रा.सायखेडा, ओम राठोड वय 10 वर्ष, बेबी राठोड वय 35 वर्ष तीन्ही रा.सायखेडा आदीं जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास गरड रुग्ण सहाय्यक ढोणे, शेख अखिल, आदींनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला असून यातील एका प्रवाशाची प्रकृती खालवल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे सदर बसचे अपघात चालक शेळके यांच्या हाताला मुका मार लागला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही,इतर प्रवाशांना मागुन आलेल्या वझर जिंतूर बस मध्ये बसवून बस स्थानका पर्यंत पाठवण्यात आले आहे. नेमके अपघात कशामुळे झाले का झाला ही माहिती मिळू शकली नसून या घटनेची माहिती आगरा व्यवस्थापक यांना मिळाल्यानंतर दुपारी 11 च्या सुमारास घटनास्थळी जाऊन आगारा व्यवस्थापक जावळेकर व ड्रायव्हर, मेकानिक आदींच्या पथकाने घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा केला असून या अपघातात एसटी महामंडळाचे तब्बल एक लाखाच्यावर नुकसान झाल्याचे बोलले जात आहे बातमी देईपर्यंत पोलिसात कोणती नोंद झालेली नव्हती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या