🌟परभणी लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची दुसऱ्यांदा सुपारी ?


🌟खासदार जाधव यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली संरक्षण देण्याची मागणी🌟


परभणी (दि.२५ मार्च) - परभणी जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात आहे की बिहारात ? असा गंभीर प्रश्न निर्माण होत असून परभणी जिल्ह्यात प्रतिष्ठित व्यापारी/उद्योजक/लहाण मोठे गुत्तेदार (कॉन्ट्रेक्टर)/पत्रकार/स्थानिक लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी/महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या सुरक्षेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह निर्माण होत असतांनाच आता चक्क देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेचे सदस्य परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना चक्क दुसऱ्या वेळेस जिवे मारण्याची कोट्यावधी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती दस्तुरखुद्द खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीणीचे प्रतिनिधी पंकज सिरसागर यांच्यासह अन्य प्रसार माध्यमांपुढे उपस्थित होऊन उघड केली.

मराठवाड्यात सर्वात मागासलेला व अविकसित समजला जाणारा परभणी जिल्ह्याचा मागील इतिहास बघितल्यास असे निदर्शनास येते की या जिल्ह्यात नैतिकतेला मुठमाती देऊन सातत्याने अनैतिकतेला प्राधान्य देण्याचे काम राजकारण्यांकडून झाले त्यामुळे जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांसह गुन्हेगारी माफियाशाही उदंड झाली याचा दुष्परिणाम म्हणजे जिल्ह्यात नैतिकता जोपासन्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,तत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी पत्रकार सातत्याने गुन्हेगार माफिया तस्करांच्या डोळ्यात खुपू लागले देशाची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते त्या भारतीय संसदेचा सदस्य अर्थात खासदाराचे जिवणच ज्या जिल्ह्यात सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय ? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना म्हणजेच खा.जाधव यांना जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे हे प्रकरण...

राष्ट्रीय वृत्त वाहिणी असलेल्या एबीपी माझा या वृत्तवाहीनेचे प्रतिनिधी पंकज सिरसागर यांच्या वृत्तानुसाला परभणी जिल्ह्यात वास्तव्यास येऊन खासदार जाधव यांच्या जिवितास धोका निर्माण केला जात आहे खासदार जाधव यांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या अश्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन आता परभणी जिल्हा पोलिस दला समोर निर्माण झाले आहे.

परभणीचे खासदार जाधव यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका जवळच्या हितचिंतकाने सांगितले की तुम्ही सावध राहा तुमच्या जिविताला धोका आहे तुम्हाला जिवे मारण्याची तिन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे या संदर्भात खासदार जाधव यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरुपात पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे सदरील प्रकार अत्यंत गंभीर असून यापुर्वी देखील दोन वर्षापूर्वी खासदार संजय जाधव यांना नांदेड येथील एका गँग कडून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खासदार जाधव यांना तात्काळ संरक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या