🌟पुर्णेतील पुर्णेश्वर शिवमंदिरात भागवत कथा ज्ञानयज्ञ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा व यात्रा महोत्सव...!


🌟दि.०३ एप्रिल रोजी हभप.श्री.दशरथ महाराज अंबोरे (चारठाणकर) यांचे काल्याचे किर्तन होणार🌟

पुर्णा (दि.१४ मार्च) - पुर्णा नदीपात्रावरील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या श्री.पुर्णेश्वर शिवमंदिर संस्थान येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अंमली बारशी निमित्त पुर्णा नदीलगत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ निसर्गरम्य वातावरणात सोमवार दि.२७ मार्च २०२३ ते सोमवार दि.०३ एप्रिल २०२३ या सप्ताहात हभप.सटवा महाराज भोसले (सुहागणकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री.भागवत कथा ज्ञानयज्ञासह श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


श्री.पुर्णेश्वर शिवमंदिर संस्थान परिसरात आठवडाभर चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यास दि.२७ मार्च २०२३ पासून प्रारंभ होणार असून भागवत कथेची वेळ सकाळी ११-०० ते ०५-०० असून श्री.ज्ञानेश्वरी पारायनाची वेळ सकाळी ०६-०० ते १०-०० अशी राहणार आहे तर सोमवार दि.०३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११-०० ते ०१-०० वाजे दरम्यान हभप.श्री.दशरथ महाराज अंबोरे (चारठाणकर) यांचे काल्याचे किर्तन होणार असून या भव्य भागवत कथा ज्ञानयज्ञ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा व यात्रा महोत्सवात भागवताचार्य हभप.श्री.सटवा महाराज भोसले (सुहागणकर),श्री.ज्ञानेश्वरी पारायनकार श्रीरंग सखाराम पवार,शंकर नारायनराव डाबळे,दिपाजी नारायनराव शेळके तर सिंथवादक नागोराव भोसले,तबलावादक माऊली बुचाले (आव्हईकर),गायक दौलतराव बुचाले (आव्हईकर) यांचे विशेष योगदान राहणार असून दि.०३ एप्रिल २०२३ रोजी यात्रा महोत्सवा निमित्त पुर्णेश्वर शिवमंदिर संस्थान येथे दुपारी ०१-०० ते ०५-०० वाजेपर्यंत श्रींच्या महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या भागवत कथा ज्ञानयज्ञ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा व यात्रा महोत्सवात जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त पुर्णा गावकरी मंडळी व ओम नमःशिवाय मंडळ पुर्णाच्या वतीने करण्यात आले असून या धार्मिक उत्सवात दान करणाऱ्या भाविकभक्त दात्यांनी वैभव कुऱ्हे मो.क्र.९७६५९१६७६८,चंद्रकांत लोखंडे मो.क्र.८५५२८०७६७७,सुधाकर कुऱ्हे मो.क्र.७३९१८२३४०३ यांच्याशी संपर्क साधावा......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या