🌟परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे लोकनेते विलासराव देशमुख अर्बन निधी लिमिटेडचे उद्घाटन...!


🌟लातुरचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन🌟

परभणी (दि.१२ मार्च) - जिल्ह्यातील सोनपेठ येथील गंगाखेड रोड वरील लोकनेते विलासराव देशमुख अर्बन निधी लिमिटेडचे उद्घाटन शनिवार दि.११ रोजी लातुरचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

            नव्याने स्थापन झालेल्या लोकनेते विलासराव देशमुख अर्बन निधी लिमिटेड च्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर आ.सुरेशराव वरपुडकर, आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. व्यंकटराव कदम, विजयराव देशमुख, माजी आ. आर. टी.देशमुख, प्रमोद जाधव, अनिल नखाते, दत्तराव मायंदळे, लक्ष्मीकांत देशमुख, माजी उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, दिगंबर भाडूळे, मुंजाभाऊ धोंडगे,  श्रीकांत विटेकर, परमेश्‍वर कदम,  रंगनाथ रोडे, मधुकर निरपणे, उमेश आप्पा नित्रुडकर, दिगंबर भाडुळे, श्रीराम भंडारे, रंगनाथ सोळंके, बाबासाहेब फले, भगवान पायघन, जगदीश बुरांडे, प्रभाकर शिरसाट, सतीश देशमुख, अजित देशमुख, योगेश कदम, राजू सौदागर, कृष्णा पिंगळे, खदीर विटेकर, अनिल जाधव, रमेश उबाळे, संदीप चांदणे, इंद्रजीत वरपूडकर, शिवाजी मव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

           यावेळी सोनपेठ येथील स्वामी समर्थ महिला बचत गटास गृह उद्योगासाठी 50 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. तर महेश बडेकर यांना व्यवसायासाठी 30 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. तसेच शंकर मुळे यांनी 1 लाख रुपयांची बँकेत ठेव जमा केली व शशिकांत भोसले यांनी कन्यादान योजनेअंतर्गत 5 हजार रुपये प्रति महाप्रमाणे ठेवीचे खाते उघडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष जगन्नाथ कोलते, उपाध्यक्ष दादाराव आढाव, सचिव सदाशिव भोसले, संचालक गणेश भोरे, अनिल भोसले, सुनील कोलते, ज्ञानेश्वर मस्के, सच्चिदानंद जगदाळे, दीपक भोसले, विष्णू भोसले, ड. अशोक तिरमले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या