🌟निज निज रे बाळा करू नकोस तू चिंता काळजी नाही रे तुझी या एसटीच्या अधिकाऱ्यांना....!


🌟हिरकणी कक्ष : नसल्याने स्तनदा मातांची होते कुचुंबना🌟

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवासात महिलांना आपल्या तान्हुल्यांनास स्तनपान  करण्यासाठी वेगळी जागा मिळत नाही. अशावेळी बाळ भुकेने व्याकुळ होतात हे ओळखून ब्रेस्ट फिल्डिंग प्रमोशन नेटवर्क कौन्सिलिंग यांच्या सूचनेवरून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बस स्थानकात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला स्तनदा मातांसाठी सुरू केलेला हिरकणी कक्ष एस टी महामंडळांकडून काहीही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. जिंतूर येथील बस स्थानकात हिरकणी कक्ष अद्यापही उघडलेला दिसत दिसून येत नाही .


* जिंतूर बसस्थानकात हिरकणी कक्ष ?

येथील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रेलचेल असते त्यामुळे त्यात अनेक महिला आपल्या तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी त्यांच्या मातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे कारण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून बसस्तानकात स्वतंत्र असा हिरकणी कक्ष दिसून येत नाही. त्यामुळे स्तनपान पाजण्यासाठी उघड्यावरच कित्येक महिलांना आपल्या भुकेलेल्या बाळासाठी उघड्यावरच लपून स्तनपान करावे लागते.

* स्तनदा मातांनी करायचे काय :-

बस स्थानक सारख्या वर्दळीच्या ठिकाणी स्तनदा मातांना आपल्या तालुक्याला स्तनपान करण्यासाठी ओशाळल्यासारखे व्हायचे बाळाला सतनपान करताना त्यांची कुचुंबना होत असे, यावर तोडगा काढण्यासाठी हिरकणी कक्ष सुरू केले परंतु बस स्थानकात जनजागृती व सुविधाचा अभाव यामुळे महिलांची कुचंबना होत असताना दिसते.


* सुसज्ज इमारत,मात्र हिरकणी कक्ष नाही :-

जिंतूर बस स्थानकात कंट्रोल ऑफिसच्या बाजूला हिरकणी कक्ष करणार असल्याचे आगारातील एका अधिकाऱ्यांनी  सांगितले.

यासाठी जनजागृती होणे गरजेचे असताना स्तनपान करण्यासाठी बसायला जागा नसल्यामुळे नीज नीज रे बाळा, करू नकोस रे तू चिंता, काळजी नाही रे तुझी या एसटीच्या अधिकाऱ्यांना अशी म्हणण्याची वेळ स्तनदा मातावर आली आहे. याकडे संबंधित प्रशासने लक्ष देण्याची मागणी प्रवाशां कडून होत आहे.

* बस स्थानकात पिण्यासाठी पाणी नाही :-

जिंतूर बस स्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत असल्याने नुकतेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत व प्रवाशी संघटनेकडून तसे तक्रार अर्ज ही देण्यात आला असला तरी सध्या मार्च महिना असल्यामुळे ऊनही कडाक्याचे तापत आहे त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन कुचंबना होत आहे त्यासाठी नाईलाजाने प्रवाशांना तहान भागवण्यासाठी एसटी महामंडळाचे लेबल असलेली पाण्याची बाटली नाईलाजाने 20/- रुपये या दराने  खरेदी करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या