🌟परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३५ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या....!


🌟जून २०२३ पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात :  आयुक्तांनी दिले आदेश🌟

परभणी (दि.१३ मार्च) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रियांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ३५ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या आहे.

          शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज सोमवार दि.१३ मार्च २०२३ रोजी मुंबईत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त डॉ.दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली. त्यातून, येत्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ मनुष्यबळाच्या नियुक्तीची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी आयुक्त म्हैसेकर यांनी या मागणीची दखल घेवून येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३५ तज्ञ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात येत असल्याचे आदेश काढले. या प्रतिनियुक्त्यांमुळे आगामी वर्षापासून येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे.

          दरम्यान, आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रतिनियुक्त्यांचे आदेश काढताना संबंधित महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना या प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीसाठी तातडीने कार्यमुक्त करावे, असेही म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या