🌟परभणीत नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात संपन्न....!


🌟कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले🌟

परभणी : परभणी येथे शुक्रवार दि.17 मार्च 2023 रोजी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) च्या नेहरू युवा केंद्र परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय युवा उत्सव 2023 चे आयोजन कै.सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे करण्यात आले. या कार्यक्रमात विकसित भारताचे लक्ष्य ह्या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा, कवितावाचन स्पर्धा, भाषणस्पर्धा आणि छायाचित्रण स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 

  'युवा शक्ती से जन भागीदारी' हे याचे ब्रीदवाक्य आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री हेमंतरावजी जामकर, नेहरू युवा केंद्र परभणीचे जिल्हा युवा अधिकारी मा. श्री.शशांक रावुला, श्री.संग्राम जामकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.वसंत भोसले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियान (कैच द रेन ) च्या पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचा समारोप हा क्रमांकप्राप्त विजेत्या सहभागिंना प्रमाणपत्रे तसेच रोख बक्षिसांच्या वाटपाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका. श्रीमती.आशा गिरी मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्र परभणीचे श्री.गौतम ढगे, दीपक खुळे, सारिका पतंगे, रघुनाथ शिंदे, प्रियंका खुणे, पूजा पौळ, प्रियंका श्रीवास्तव, स्नेहा वाघमारे, हर्षदा पंडित, तेजस्विनी दौंडे व सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांनी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या