🌟परभणी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे 'राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव 'पुरस्काराने सन्मानित...!


🌟चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला सन्मान🌟

परभणी (दि.०९ मार्च) - येथील सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार मदन ( बापू) कोल्हे संपादक धर्मभूमी यांना 'राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव' राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करुन गौरविण्यात आले आहे.

 चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहामध्ये दि.५ मार्च २०२३ रविवार रोजी सकाळी ११-३० वाजता झालेल्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना (भारत) ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना व यु.एस.न्युज २४  सलग्न माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना (म.रा.), इंडिया २४ न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२३ मध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या मान्यवरांना सोहळ्याचे प्रमुख आयोजक तुळशीरामजी जांभूळकर यांनी विविध पुरस्काराने सन्मानित करुन गौरव केला, त्यामध्ये परभणीचे जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे संपादक धर्मभूमी यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार 'माणुसकी जपुन मानवता धर्म पाळत पत्रकारीतेच्या माध्यमातून उल्लेखनिय सामाजिक कार्याची दखल घेऊन, ' राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव 'पुरस्कार देऊन गौरविले आहे अल्पसंख्याक आयोग (भारत सरकार ) चे सदस्य डॉ.अविनाशजी सकुंडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याचे उदघाटन वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख मा.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्र पुरते आमदार किशोरभाऊ जोरगेवार, इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख निबेकर, पोलिस मित्र चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कैलास पठारे, मराठी फिल्म अभिनेते विजयकुमार श्रीराम खंडारे, श्रीमती फेम हिरो विजय खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन मुख्य संपादक , इंडिया २४ न्युज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना (महाराष्ट्र) चे तुळशीराम हनुमानजी जांभूळकर यांनी वरील चार ही संस्था च्या कार्याची माहिती देऊन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्रमुख पाहुणे, इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीदेवी पाटील यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले म हाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रा.डाॅ.सुर्यकांत राजाराम वाकळे (लातुर) यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाराष्ट्र रत्न व इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शिंदे संपादक भाव नगरी (बारामती) यांना महाराष्ट्र रत्न,दै.जगद्रक्ष चे संपादक,इरा चे हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम प्रल्हादराव धायजे यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार यांचेसह सांगली जिल्ह्यातील इतर सहा जणांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या सोहळ्याचे सुत्र संचालन श्रुती सपन सरकार हिने उत्कृष्टरित्या  केले .हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी इंडिया २४ न्युज च्या संपादिका सौ.शिल्पाताई प्रफुल्ल बनपुरकर, इंडिया २४ न्युज चे मुख्य कार्यकारी संपादक राज जांभुळकर आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.तर मदन (बापू)कोल्हे यांना ' राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव 'पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या