🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शासनाकडून शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा फंडावर फंड...!


🌟शहरात विकास कामांच्या नावावर बोगस कामे अन् शासनाच्या तिजोरीला मात्र फुकट भुर्दंड ?🌟


पुर्णा (दि.३१ मार्च) - पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जणूकाही बोगस विकासा कामांची गटार गंगाच वाहतांना निदर्शनास येत असून या बोगस विकास कामांच्या गटारगंगेत भ्रष्ट अधिकारी तत्वभ्रष्ट राजकारण्यांसह बोगस कामांच्या गटारगंगेत स्वतःच्या स्वार्थाची नौका चालवणारे असंख्य गुत्तेदार आपणे हात ओले करुण घेत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाल्या कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर देखील विकास मात्र शुन्यच असल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी संपल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षा गंगाबाई सितारामआप्पा एकलारे यांनी आपला पदभार सोडल्यानंतर नगर परिषदेवर प्रशासक म्हणून शासनाकडून गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधिर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर संबंधित प्रशासकांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या स्वच्छ कारभाराला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु पुर्णेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल नगर परिषदेचा कारभार सुधारण्या ऐवजी जास्तच प्रमाणात बिघडत गेला नगर परिषद प्रशासनावर प्रशासकांची मजबूत पकड नसल्यामुळे नगर परिषद अधिकारी/कर्मचाऱ्यांसह आपल्या पदावरून पायउतार झालेले भ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी भ्रष्ट गुत्तेदार आदींनी पाहता पाहता भ्रष्टाचाराचा भस्मासूर निर्माण करीत शहराच्या विकासाला भस्म करण्याचा जनुकाही विडाच उचलला अन् शहरात कोट्यावधी रुपयांच्या अत्यंत निकृष्ट दर्जाहीन कामांची मालिका सुरु झाली.


पुर्णा नगर परिषद प्रशासनास लोकसभा/राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या विशेष निधीसह नगर विकास मंत्रालय,जिल्हा नियोजन समिती मार्फत शहरातील सार्वजनिक सिमेंट रस्ते/नाल्या बांधकाम,सभागृह बांधकाम,सुशोभिकरण,अंडरग्राऊंड केबल,पेव्हर ब्लॉक,हॉटमिक्स डांबरीकर,घन कचरा व्यवस्थापण,नवीन गार्डन (बगीचा) उभारणी,विद्युत पोल,विविध विकासकामांसह स्ट्रिटलाईट अर्थात विद्युत रोशनाईसाठी,सोलर पध्दतीचे दिवे आदी कामांसाठी कोट्यावधी निधी प्रशासनाकडून प्राप्त झाला असून जिल्हा वार्षिक योजना २०२२/२३ या वर्षापरीता नुकतेच ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी जवळपास ९ ते १० कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी मंजूर केला ज्या विकासनिधी अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ०८ परिसरात १५ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून सिमेंट रस्त्यासह नालीचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे तर घणकचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहरात घणकचरा व्यवस्थापणाचा कुठेही थांगपत्ता नाही तर प्रभाग क्रमांक ०२ परिसरातील श्री.स्वामी समर्थ केंद्र भागात ५० लाखांच्या निधीतून सिमेंट रस्ता व याच प्रभाग ०२ मधे ५० लाखांच्या निधीतून सिमेंट नाली बांधकाम अश्या तब्बल १ कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट नाली/सिमेंट रस्ता बांधकाम ? तर प्रभाग क्रमांक ०७ परिसरात तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून भराडे यांचे घर ते कावशी नानाला सिमेंटरोड/सिमेंट नालीचे बांधकाम तेही निकृष्ट दर्जाचे तर याच प्रभाग क्रमांक ०७ मधे तब्बल ३५ लाख रुपयांच्या निधीतून थोरात यांचे घर ते साळवे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर याच परिसरात अफजल यांचे घरापासून ते हबीब कुरेशी यांच्या घरापर्यंत तब्बल २ लाखांच्या निधीतून सिमेंट नालीसह पाच ढापे बांधकाम तर पुन्हा याच परिसरातील साईबाबा नगरात तब्बल २५ लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नालि बांधकाम तर प्रभाग क्र १० परिसरात तब्बल ५० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर याच परिसरातील क्रांतीनगर परिसरातील वंटनकर ते बाबुलाल यांच्या घरापर्यंत तब्बल ५० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर पुन्हा याच प्रभागातील मुंजा आसोरे ते रमेश दवने यांच्या घरापर्यत तब्बल ३० लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर ब्लॉकचे काम तर प्रभाग क्रमांक ०१ परिसरात अनावश्यक ठिकाणी मस्तानपुरा नवी आबादीत तब्बल १० लाख रुपयांच्या निधीतून अंडरग्राऊंड केबलसह विद्युत पोल उभारणी तर पुन्हा प्रभाग क्रमांक ०७ मध्ये तब्बल १० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०१ मधील अजिज नगर येथे तब्बल १० लाख रुपयांच्या निधीतून अंडरग्राऊंड केबलसह विद्युत पोल उभारणी तर पुन्हा प्रभाग क्रमांक ०७ मध्ये तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०३ परिसरात तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०६ मध्ये तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्त्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०२ मधील वैभव जिनिंग (वादग्रस्त जागा) मधील ओपन स्पेस जागेत तब्बल १ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन गार्डन विकसित करणे तर प्रभाग क्रमांक ०५ मध्ये तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०१ मधील अजिज नगर परिसरात तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर प्रभाग क्रमांक ०१ मधील मस्तानपुरा परिसरात पुन्हा ३० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम तर याच प्रभाग क्रमांक ०१ परिसरातील नवी आबादी परिसरात तब्बल ३० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता/सिमेंट नाली बांधकाम अश्या प्रकारे तब्बल जवळपास ०९ ते १० कोटी रुपयांची निकृष्ट दर्जाची काम करीत शासकीय विकासनिधीची धुळधान सोईस्कररित्या करण्याचा गंभीर प्रकार होत असतांना नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे,नगर अभियंता मंगेश देशमुख (अकार्यक्षमतेचा ठपका : सक्तीच्या रजेवर),प्रभारी चार्ज संगणक अभियंता सिध्दार्थ गायकवाड,सब ओव्हर सियर संजय दिपके हे 'एकमेका सहाय्य करू....शासकीय विकासनिधी खुशाल गिळूचा' कारभार सोईस्कररित्या राबवत असल्यामुळे संपूर्ण शहरात एक प्रकारे बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांची मालिका राबवली जात आहे.......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या