🌟पूर्णा तालुक्यातील गौर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी....!


 🌟यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरही संपन्न🌟

परभणी प्रहार जनशक्ती पक्ष पुर्णा च्या वतीने तथा युवंत फाउंडेशन व लॉयन्स हॉस्पिटल नांदेड च्या सहकार्याने पूर्णा तालुक्यातील गौर येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
ग्रामीण भागातील सामान्य व गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा योग्यरीत्या व मोफत मिळाव्या म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येतात याचाच एक भाग म्हणून आज या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा शाखेच्या वतीने करण्यात आले.
लॉयन्स रुग्णालय, नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात आलेल्या गौर येथील २०० च्या वर नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली तसेच याच शिबिरात मोतीबिंदू निष्पन्न झालेल्या ४० रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेड येथील लॉयन्स हॉस्पिटल येथे लगेचच पाठविण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या