🌟बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शहीद दिनाचे औचित्य साधून मोफत आयुष्यमान भारत कार्डचे वाटप...!


🌟सचखंड गुरूद्वाराचे मित जत्थेदार साहेब बाबा जोतिंदरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले वाटप🌟


नांदेड (दि.23 मार्च) - बाबा फत्तेहसिंघजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था हुजूर साहिब नांदेड तसेच नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना तसेच गुरूद्वारा बोर्डाच्या सहकार्याने शहीद भगतसिंघ, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीददिनाचे औचित्य साधून मोफत आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्डचे जवळपास 2300 स्मार्ट कार्डचे वाटप तसेच शरबत वाटप गुरूद्वाराचे मित जत्थेदार साहेब बाबा जोतिंदरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले.


संस्थेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात गुरूद्वारा बोर्ड संचलित दशमेश हॉस्पिटल येथे कॅम्प घेण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या वतीने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये जवळपास दोन हजारहून अधिक लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली होती. आज गुरूवार दि. 23 मार्च रोजी 2300 स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. यानंतरही असेच कॅम्प घेणार असल्याचे मनबीरसिंघ ग्रंथी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी, सुखविंदरसिंघ हुंदल, भागिंदरसिंघ घडीसाज, गुरूमितसिंघ महाजन, अवतारसिंघ पहरेदार, जसपालसिंघ लांगरी, राजेंद्रसिंघ पुजारी, नारायणसिंघ वासरीकर, राजेंद्रसिंघ शाहू, टहेलसिंघ निर्मले, हरभजनसिंघ दिगवा, भुपेंदरसिंघ रंगी, गुरूचरणसिंघ चंदन, श्रीधर नागापूरकर, बंदीछोडसिंघ खालसा, इंदरजितसिंघ कडेवाले, जसबिरसिंघ हंडी, राजसिंघ रामगडीया, जसबीरसिंघ बुंगई, रमनदीपसिंघ ग्रंथी, लखनसिंघ कोटतीर्थवाले, परशनसिंघ नहेंग, केअरसिंघ, अजितसिंघ बेदी आदींची उपस्थिती होती. मनबीरसिंघ ग्रंथी यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या