🌟भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन....!


🌟आ.आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ करण्यात आले प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन🌟

सेलू (दि.२१ मार्च) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी आ.आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

         युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, तालुका प्रभारी दत्ता कदम, तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, भागवत दळवे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे करडगाव शिवारात दहन केले. तसेच सनातन धर्म संस्कृतीचा अवमान केल्याबद्दल आव्हाड यांचा निषेध केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या