🌟संपात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्याची जिंतूरात कार्यवाही सुरू....!


🌟राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलकांना आंदोलनासंदर्भात कारवाई करणे बाबत निर्देश🌟 

जिंतूर प्रतीनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस यावर कार्यवाही म्हणून सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासनास  संपकऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील संपाचा आज दुसरा दिवस संपात सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला तर 727 कर्मचारी सहभागी झाले असे लेखी दिले आहे तर प्रत्यक्ष आंदोलनात मात्र मोजके कर्मचारी होते परंतु जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर आहेत अशांना प्रशासनाच्या वतीने लवकरच नोटीस तामील करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती प्रसासना कडुन समजली  दरम्यान नोटीस मध्ये संपात सहभागी होणे गैरवर्तणूक ठरविले जाईल असे म्हंटले आहे सदर नोटीस देण्यात येणाऱ्या पत्रात खालील प्रमाणे मजकूर  आहे.

* राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलकांना आंदोलनासंदर्भात कारवाई करणे बाबत निर्देश :-

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक संघटना 15 22 /प्र.क्र.36-अ/  दिनांक 13. 03. 2023अन्वे दिनांक 14 .03 .2023 पासून कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलकांना आंदोलनासंदर्भात कारवाई करणे बाबत निर्देश आहेत. ज्या अर्थी आपण उपलब्ध संपामध्ये सामील आहात त्या अर्थी शासन कामगार सुरळीत रित्या पार पाडण्याच्या दृष्टीने आपणास सूचित करण्यात येते की संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये केंद्र शासनाचे 'काम नाही वेतन नाही' हे धोरण राज्य शासनाने ही अनुसरले आहे संपामध्ये सहभागी झाल्यामुळे आपल्या सेवेमध्ये खंड पडू शकतो यांची आपण नोंद घ्यावी.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या