🌟पुर्णा नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराला त्रिवार वंदन ? ३३ लाख रुपयांच्या निधीतून बांधला बेकायदेशीर वसाहतीत रस्ता पांदन...!


🌟शहरातील मस्तानपुरा नवी आबादी परिसरात अवघ्या सहा महिन्यापुर्वी बांधलेल्या रस्त्याला भुकंप सदृष्य तडा🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाने कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची विकासाच्या नावावर सोईस्कररित्या विल्हेवाट लावून शहरातील विविध भागातील निर्मनुष्य वसाहतींसह एनए/लेआऊट देखील न झालेल्या भागात सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांची बांधकाम करून 'बोगस कामे करून शासनाला कळवा अन् शासकीय विकासनिधी कागदोपत्री जीरवा' असे अजब धोरण राबवण्यास सुरुवात केल्यामुळे ज्या वसाहतींमध्ये खऱ्या अर्थाने विकासकामांची आवश्यकता आहे त्या भागास भकास करण्याचे तर आवश्यकता नसलेल्या भागात विकासनाट्य रंगवून बोगस काम करण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.


 शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नवी आबादी मस्तानपुरा परिसरात करोडोच्या विकासनिधी खर्च करून अवघ्या चार/सहा महिन्यापुर्वी झालेल्या सिमेट रोड/सिमेंट नाल्यांची झालेली वाईट अवस्था नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे तत्कालीन नगर अभियंता देशमुख व सहा.अभियंता संजय दिपके यांच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभाराची प्रत्यक्ष साक्ष देत असून शासकीय विकासनिधीची कशी सोईस्कररित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे या अल्पशः कालावधीत भुकंप सदृष्य तडा गेलेल्या सिमेट रस्त्यावरून व अल्पकालावधीतच मोडकळीस आलेल्या सिमेंट नाल्यांवरून निदर्शनास येत आहे.  
 

राज्याचे तात्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या विकास निधीतून नवी आबादी मस्तान पुरा परिसरात निकृष्ट व बोगस कामे करण्यात आल्याने मुख्याधिकारी नरळे,नगर अभियंता देशमुख,सहा.अभियंता दिपके यांच्यासह नगरपालिका प्रशासक यांना देखील जवाबदार धरून त्यांच्यासह संबंधित कामाच्या गुत्तेदारावर सुध्दा कारवाई करण्यात यावी व शहरातील सर्व प्रभागांमध्ये झालेल्या व होत असलेल्या विकासकामांची सखोल चौकशी करून गुत्तेदारांचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या