🌟राष्ट्रहिताचे व लोकहिताचे कार्य करण्यासाठी प्रशासनात या - नितीन सोनकांबळे


🌟श्री.गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयात आयोजित व्याख्याना प्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟


पुर्णा (दि.२८ मार्च) - श्री गुरु बुद्धिस्वामी  महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पोलीस प्रशासनात कार्यरत असलेले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक नितीन सोनकांबळे यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितीन सोनकांबळे (पोलीस उपनिरीक्षक,मुंबई) तर उपप्राचार्य श्रीमती फातेमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पुष्पा गंगासागर यांनी केले प्रमुख वक्ते नितीन सोनकांबळे  यांनी विद्यार्थी मार्गदर्शन करताना म्हटले कि मी पण श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील विदयार्थी असून तुम्ही ज्या बेंचवर आज आहात काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी होतो पण महाविद्यालयीन शिक्षण आणि  आत्मविश्वासाने केलेली मेहनत व जिद्दीमुळे मी आज प्रशासनात कार्यरत आहे. महाविद्यालयात शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनले पाहजे,स्वतःच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करीत चिकित्सक बुद्धीने वैज्ञानिक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून काय चांगले काय वाईट हे ठरवून आपले ध्येय  साध्य करावे. समाजहित  राष्ट्रहितांचा आदर करत मानवीमूल्य जोपासात राष्ट्रहिताचे व लोकहिताचे कार्य करण्यासाठी प्रशासनात यावे असे मार्गदर्शन करताना अशा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी नितीन सोनकांबळे यांच्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक प्रसंग प्रकाशात आणून महाविद्यालयातील बिकट परिस्थितीला झुंज देत अनेक विदयार्थी आज  मोठ मोठ्या पदावर कार्य करीत असून हे महाविद्याल्याच्या अभिमानाची बाब आहे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.अजय कुऱ्हे (कार्यक्रमाधिकारी रा.से.यो.), डॉ. राजीव यशवंते (माजी विद्यार्थी समन्वयक) डॉ. विजय पवार, डॉ. सोमनाथ गुंजकर,डॉ.स्मिता जमदाडे तसेंच माजी विदयार्थी संघटनेतील सर्व पदाधिकारी प्रा. दिनेश पवार, विष्णू कदम,प्रा.त्र्यंबक बोबडे यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.ओमकार चिंचोले यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या