🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता कायम राहणार....!


🌟शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे खासदार संजय जाधव यांनी केले प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.२४ मार्च) - पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना (उध्दव ठाकरे) गट ताकतीने लढविणार आणि जिंकणारही असे प्रतिपादन शिवसेनेचे खा संजय जाधव यांनी सरपंच चेअरमन यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

या वेळी प्रास्तविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ही निवडणूक अंगावर घेऊन घरात जाऊन मतदारापर्यन्त जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात विजयश्री खेचून आणतील असा विश्वास दिला तर बाजार समितीचे माजी सभापती बालाजी देसाई यांनी शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता पुढेही कायम कशी राहील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तालुक्यातील सर्वात जास्त सहकारी संस्था ह्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम केल्यास समोरील पनॉल चे डिपॉझिट जप्त करण्यासाठी सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी कमाला लागण्याचे आव्हान केले.

यावेळी तालुक्यातील सर्व चेअरमन संचालक,सरपंच ग्राम पंचायत सदस्य उपस्तीत होते हे कार्यक्रम यश यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे उपतालुका बालाजी वैद्य, सुदामराव डोईफोडे,उपसभापती बोबडे मामा ,नारायण पिसाळ, कोंडीबा सोनटक्के, विश्वनाथ आपा सोळंके, सुदाम ढोणे, कुंडलिक मोरे, मुंजाभाऊ कदम, श्याम कदम, बंडूआपा बनसोडे, बंटी कदम, यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या