🌟सम्राट अशोक यांचे लोक कल्याणकारी राज्य भारतीय इतिहासातील सोनेरी पर्व होते - भदंत पय्या वंश


🌟यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम खंदारे यांची उपस्थिती🌟 


पूर्णा (दि.30 मार्च) - सम्राट प्रतिष्ठान,बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व धम्मकार्यात अग्रेसर असलेल्या महिला मंडळाकडून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2327 जयंती महोत्सव दि.29 मार्च 2023 रोजी दुपारी 01-00 वाजता शहरातील भिम नगर या ठिकाणी भैय्यासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो,भदंत पयावंश भदंत संघ रत्न यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त रेल्वे गार्ड सिद्धार्थ भालेराव हे होते.


प्रमुख उपस्थितीमध्ये माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड सेवानिवृत्त रेल्वे गार्ड गौतम जोंधळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पयावंश यांनी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या समस्त जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकताना सांगितले.

कलिंगच्या युद्धात झालेल्या मानवी सहारामुळे दुःखीत झालेले सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्म स्वीकारून 84000 बुद्ध विहार व लेण्या तयार करून स्वतःच्या मुलगा महेंद्र मुलगी संघमित्रा यांना भिकू संघास दान देऊन धम्माचा देश विदेशात प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर केला.बहुजन हिताय बहुजन सुखाय चे आदर्श कल्याणकारी राज्य सम्राट अशोकाचे होते.महामानव तथागत भगवान बुद्धांचे शील सदाचार प्रज्ञा करुणा मंगल मैत्री विश्वबंधुत्व ही भावना च जगामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करू शकते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक वाघमारे यांनी तर सूत्रसंचालन बौद्धचार्य उमेश बराटे यांनी केले धम्मविधी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी यांनी पार पाडला आभार प्रदर्शन रवी गायकवाड यांनी केले.खीर दान स्मुर्ति शेष अशोक कमलाकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ गिरजाबाई अशोक गायकवाड यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसमुदाय महिला मंडळ युवक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या