🌟वंचित बहुजन युवा आघाडीच्या मोफत शिक्षण योजनेच्या ऑनलाईन प्रवेश फॉर्मचा लाभ घ्यावा - प्रेम जगतकर


🌟आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांसाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबवली🌟

परळी (दि.08 मार्च) - वंचित बहुजन युवा आघाडीच्या मोफत ऑनलाईन शिक्षण योजनेच्या फॉर्म भरून घेण्याचा लाभ घ्यावा असे आव्हान वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.                       

याबाबत सविस्तर माहिती अशी की आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अपेक्षित रित्या शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने संबंधित विद्यार्थ्यांसाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यात गरजू विद्यार्थ्यांना पात्र शाळेत 25% आरक्षणा नुसार मोफत प्रवेश दिला जातो यासाठी विविध आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर संबंधितांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यावर सोडतीच्या माध्यमातून नंबर लागतो या प्रक्रियेसाठी संबंधितांचे आधार कार्ड मुलाचा जन्म दाखला ज्या भागातून अर्ज करणार आहे तेथील रहिवासी पुरावा अशी काही कागदपत्रे यासाठी आवश्यक असून परळी शहर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर बंगला गल्ली देशमुख गल्ली होळकर चौक गणेश पार रोड आदी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अर्ज भरून देण्यासाठी व्यवस्था केली असून यासाठी वरील कागदपत्रे दिनांक 15 3 2023 पर्यंत 88 30 30 83 88 व 91 12 31 17 77 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवून वरील योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या