🌟राज्यातील शेतकऱ्यांनी कॉल करून नुकसानीची माहिती द्यावी - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार


🌟राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला स्वतःचा मोबाइल नंबर व इतर फोन नंबर केले जाहीर🌟 

✍️ मोहन चौकेकर

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे सावट उभे आहे. बर्‍याच ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी पिकांना चक्क गारपिटीने झोडपले आहे. त्यामूळे शेतातील पिकांचे भरमसाठ प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बीचे हाता तोंडाशी आलेले पीक अवकाळीने हिरावून घेतले आहे. त्यामूळे सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या मार्फत देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कृषिमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर बर्‍याचदा काही जिल्ह्यातील किंवा गावातील पिकांचे पंचनामे करण्यास मोठा वेळ लागतो. परिणामी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही. हे लक्षात घेऊन नुकसानीची माहिती ताबडतोब सरकारला मिळावी यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. ही नुकसानीची माहिती ताबडतोब मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी थेट आपला मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आहे. आता शेतकरी या नंबरवर कॉल करून नुकसान झाल्याची माहिती थेट कृषिमंत्र्यांकडे देऊ शकतात. त्यामुळे आता शेतकर्‍यांना आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना कळवता येणार आहे.

* कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या 9422204367 या नंबर वर साधा संपर्क :-

आता आपल्या पीक नुकसानीची माहिती सरकार पर्यंत पोहोचवने सोपे झाले आहे. ही माहिती शेतकरी थेट कृषिमंत्र्याच्या नंबर वर पाठवू शकतो. या नंबर वर नुकसान झालेल्या पिकांचा फोटो देखील शेतकरी पाठवू शकतात. त्यासाठी कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर *9422204367* हा आहे. अजून काही नंबर देण्यात आले आहेत..... 

*शेतकरी या नंबरांवर देखील कॉल करू शकता.* 

▪️ *022-22876342,* 

▪️ *022-22020433,* 

▪️ *022-22875930.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या