🌟नाथ शिक्षण संस्था कार्यालयात प्रा.पवन मुंडे व प्रा.शंकर कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार....!


🌟संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी शाल,फेटा बांधून,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत सत्कार केला🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे  प्रा. पवन मुंडे व प्रा. शंकर कापसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी शाल, फेटा बांधून, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत सत्कार केला.

         शहरातील नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालया येथे परळी नगर परिषदेचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे व यशवंतराव चव्हाण जुनिअर महाविद्यालयाचे प्रा.शंकर कापसे यांचा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांच्या हस्ते शाल, फेटा बांधून, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही प्रा.पवन मुंडे व प्रा.शंकर कापसे यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, प्राचार्य अतुल दुबे, सर, सोमनाथ कांदे, माऊली मुंडे,प्रा. किरण शिंदे,प्रा.उमाकांत फड, प्रा.शेख अली सर, विष्णू शिंदे, एकनाथ फड,उमेश जगताप, मुरलीधर सातपुते, उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या