🌟पालम कृषी उत्पन्न बाजार समिती वर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकवणार - संतोष मुरकुटे


🌟पालम येथील भाजपा संपर्क कार्यालयात आज गुरुवार दि.30 मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले🌟

पालम (दि.30 मार्च) पालम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीचा पॅनल उभा करून बाजार समितीवर युतीचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांनी पालम येथील भाजपा संपर्क कार्यालयात दि.30 मार्च गुरुवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

या बैठकीला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठल रबदडे, ऍड. व्यंकटराव तांदळे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले, भाजपाचे पालम तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे,शिवसेनेचे पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ,नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे,युवा अध्यक्ष नंदेश्वर बलोरे, तालुका सरचिटणीस भगवान करंजे, ,सूर्यकांत पळसकर, रुपेश शिनगारे, गोपाळ देवकते, सोपान कराळे,रोहिदास एम्बलवाड, सिताराम शेटे, सुधाकर येवले, हरिचंद्र साबळे, निवृत्ती रेडी, माऊली पैके, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संतोष भाऊ मुरकुटे म्हणाली की, मागील काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सत्ताधारी मंडळींनी काही विकासाची कामे केली नाहीत. बाजार समितीत पिण्याची पाणी नाही, कर्मचाऱ्यांचा पगार नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीती शेतकऱ्यांना बसण्याची जागा नाही. अशा अनेक समस्याने बाजार समिती विळख्यात अडकलेली आहे.

तसेच राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असून सरकारमध्ये रासपा सहयोगी आहे.गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचेआ. रत्नाकर गुट्टे रासपाचे आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे यांनी भाजप पक्षाचे खच्चीकरण करण्याचे काम आजपर्यंत केले आहे. भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फंडाचे आम्हीच दाखवून रासपामध्ये प्रवेश करून घेतले आहेत. भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बोलावून विकास कामात सहभागी करून घेतले नाही. याकरिता पालम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संपूर्ण जागेवर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार उभे करून सक्षम पॅनल उभा केला जाईल. निवडणुकीतील उमेदवाराच्या पाठीमागे संपूर्ण ताकद देऊन पालम कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप -शिवसेना युतीचा झेंडा फडकविणार असल्याचे ग्वाही यावेळी बोलताना त्यांनी दिली.

* भारतीय जनता पार्टी आयोजीत :- 

पत्रकार परिषदेत संतोष भाऊ मुरकुटे यानी बाळासाहेब शिवसेना  आमच्या सोबत  आहे पण पत्रकार परिषदेत बाळासाहेब शिवसेनेचा ,कार्यकर्ता दिसुन आला नाही त्यामुळे मतदारात तथा तालुक्यात ऐक्य  दिसुन येत नाही त्यामुळे मतदार राजा सभ्रभमात  दिसुन येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या