🌟पुर्णा नगर परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतरही करोडो रुपयांच्या बोगस विकास कामांची मालिका सुरुच...!


🌟शहरातील बोगस विकासकामांची जिल्हाधिकारी आंचल गोयल चौकशी करणार काय ?🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ मागील डिसेंबर २०२१ यावर्षी संपल्यानंतर नगर परिषद प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची नेमणूक करण्यात आली त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर नगर परिषदेचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांनाच नगर परिषदेत घोटाळ्यांची मालिकाच जणूकाही सुरु झाल्याचे निदर्शनास येत असून प्रशासकांच्या कारकिर्दीत नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचारी अक्षरशः बेलगाम झाल्याचे निदर्शनास येत असून घोटाळ्यांवर घोटाळे करीत प्रशासकांच्या नावाला देखील धब्बा लावत असल्याचे निदर्शनास येत आहे.


महाराष्ट्र शासनाने विविध योजनांअंतर्गत शहरातील विकासासाठी दिलेला करोडो रुपयांचा निधी नगर परिषद खात्यात जमा होण्यापुर्वीच थातूर मातूर बोगस काम करून हडपण्याचा सपाटा नगर परिषद मुख्याधिकारी,तत्कालीन नगर अभियंता व नगर परिषद ओव्हर सियर संजय दिपके यांच्या कृपा आशिर्वादाने शासकीय विकासनिधी प्राप्त होण्यापुर्वीच बोगस काम करीत शासकीय विकासनिधी हडपण्याचे गंभीर प्रकार सातत्याने होतांना दिसत आहे.

 पूर्णा नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या करोडो रुपयांच्या विविध शासकीय विकास योजनेतत्या फंडातून संपूर्ण शहरात अत्यंत निकृष्ट दर्जाची विकासकाम होतांना दिसत आहेत या बोगस विकासकामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे व मुख्याधिकारी अजय नरळे,नगर अभियंता,ओव्हर सियर संजय दिपके हे या कामांच्या गुत्तेदारांना पाठीशी घालत असल्यामुळे नगर परिषद संबंधित भ्रष्ट गुत्तेदार व तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींसाठी अक्षरशः 'स्विस बँक' झाल्यासारखे निदर्शनास येत आहे.नगर परिषदे अंतर्गत आजपर्यंत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या बोगस कामांची चौकशी एखादी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून किंवा प्रवर्तन निदेशालय (ईडी) मार्फत चौकशी केल्यास अनेक गुत्तेदारांसह नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचारी/आजी/माजी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.


परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरात मागील काळात झालेल्या सरसकट विकासकामांसह सद्या शहरात चालत असलेल्या विकासकामांची स्वतः येवून प्रत्यक्ष पाहणी केल्यास अनेक घोटाळे उजेडात येतील संबंधित नगर अभियंता व सहाय्यक अभियंता संजय दिपके व बोगस काम करणाऱ्या सर्वच गुत्तेदारांवर कारवाई करून निकृष्ट दर्जाची झालेली सर्व विकासकामे रद्द करुन त्या कामाची रि-टेंडर काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पुर्णा नगर परिषद प्रशासनाने नियुक्त केलेले नगर अभियंता,सहाय्यक अभियंता संजय दिपके हे आपला कारभार नगर परिषदेत उपस्थित न राहता नांदेड,परभणी, वसमत या ठिकाणाहून परस्पर चालवत करोड रुपयांची बोगस बिले बनवून करोडो रुपयांच्या शासकीय विकासनिधीची अक्षरशः उधळण करीत आहेत.

पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ०६ मध्ये भराडे यांचे घर ते डेंगळे यांच्या घरापर्यंत तब्बल ४० लाख रुपयांच्या विकासनिधीतून सिमेंट रोड/सिमेंट नालीचे बांधकाम होत असून सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अत्यंत कमी कालावधीत उरकण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे या कामाचे आदेश पारित झाले की नाही यावर ही आता प्रश्न चिन्ह निर्माण होत असून याच कामाप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील मस्तानपुरा/नवी आबादी परिसरातल्या काळ्या शेतशिवारातील एन/ए ले-आऊट न झालेल्या परिसरात तब्बल एक ६५ लाख रुपयांच्या विकासनिधीतून तर दुसरे विकासकाम ३३ लाखांच्या निधीतून ज्यात सिमेंट रोड/सिमेंट नाली बांधकाम करण्यात येत असून सदरील कामे अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरात होणारी करोडो रुपयांची विकासकाम मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या विकासनिधीसह लोकसभा/राज्यसभा सदस्यांच्या करोडो रुपयांच्या विकासनिधीतून शहरात मागील काळात झालेली व सद्या होत असलेली विकासकाम अत्यंत निकृष्ट दर्जाची असून करोडो रुपयांच्या विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावल्या गेल्याचे दिसत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या