🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड महामार्गावरच्या गोदावरी नदीवरील पुलास मान्यता....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या खा.फौजिया खान यांच्या पाठपुराव्याला अखेर यश🌟

परभणी (दि.20 मार्च) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड महामार्गावरील गोदावरी नदीवरील पूलास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिली असून निधीच्या तरतूदीसह लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीमती फौजिया खान यांनी दिली.

          परभणी-गंगाखेड हा महामार्ग सिमेंटचा झाला असून वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, या रोडवरील गोदावरी नदीवरील पूल मात्र जूनाच असून तो जीर्ण झाला आहे. परिणामी या पुलावरून वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. त्या अनुषंगाने खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 9 डिसेंबर 2022 रोजी पत्र देऊन नवीन पूल मंजूर करावा, अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून या बजेटमध्ये गोदावरी नदीवरील पुलासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी नवीन पूल निर्माण होणार असल्याचे पत्र खासदार फौजिया खान यांना संबंधित मंत्रालयाकडून 6 जानेवारी 2023 रोजी पाठविण्यात आले आहे, असे ही खासदार खान यांनी म्हटले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या