🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गास प्रवेश देणे सुरू....!🌟या प्रवेशाची शेवटची तारीख दि.३० मार्च २०२३ पर्यंत : इच्छुकांनी त्वरित प्रवेश घ्यावा🌟

पूर्णा (दि.१७ मार्च) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी प्रवेश सुरू झाल्याचे आयोजक प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी कळविले आहे. ग्रंथालय संचलनालय,महाराष्ट्र शासनाचा ग्रंथपालन वर्ग अभ्यासक्रम जिल्हा ग्रंथालय संघ परभणी द्वारा संचलित महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथपालन वर्ग २०२३ साठीची प्रवेश प्रक्रिया दि.१८/०३ /२०२३ पासून सुरू होत असल्याचे कळविले आहे. या प्रवेशाची शेवटची तारीख दि.३० /०३ /२०२३ पर्यंत आहे. तरी इच्छुकांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे वर्गाचे आयोजक प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी कळविले आहे.


या वर्गाच्या तासिका एप्रिल - मे महिन्यात येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात होतील तर जुन मध्ये परीक्षा होईल. तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी वर्गव्यवस्थापक प्रा. दत्ता पवार (9921437112), श्री भास्कर पिंपळकर (98220 18112) जिंतूर , श्री नागनाथ लटपटे (8857881111) गंगाखेड, श्री विलास शिंदे (8087479913) हिंदी-मराठी ग्रंथालय सेलु, श्री जिवन लोखंडे (9922831039) श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय पालम, श्री माधव कल्लाळीकर (9172892481) सत्यशारदा सार्वजनिक वाचनालय, परभणी, श्री निर्वळ (9890773135) मानवत यांच्याशी संपर्क साधावा. 

प्रवेशासाठी १० वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी,  ग्रंथालयाचे कर्मचारी व पदाधिकारी हे प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडलेला दाखला,मार्क मेमो,आधार कार्डाची सत्यप्रत , ग्रंथालयातर्फे प्रवेश घ्यायचा असेल तर ग्रंथालयाचे शिफारस पत्र असणे बंधनकारक आहे.शाळा, महाविद्यालयामार्फत प्रवेश घ्यावयाचा आसेल तर शाळेचे शिफारस पत्र घेऊन दिनांक १८ ते ३० मार्च दरम्यान आपला प्रवेश निश्चित करावा.

असे आवाहन प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री.भास्कर पिंपळकर , विलास शिंदे , जीवन लोखंडे,डाॅ. विलास काळे,प्रा.दत्ता पवार ग्रंथालय संघाचे सर्व कार्यकारी मंडळ यांनी केले आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या