🌟पुर्णेतील आडत दुकानांचे मनमानी भाडेवाढ प्रकरण आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या दरबारात....!


🌟आडत व्यापारी शिष्टमंडळाने घेतली आ.डॉ.गुट्टे यांची भेट :  भाडेवाढ प्रकरणावर तोडगा काढण्याचे आमदारांनी दिले आश्वासन🌟

पुर्णा (दि.०५ फेब्रुवारी) - पुर्णा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने आडत व्यापाऱ्यांशी सल्लामसलत न करता मनमानी पध्दतीने आडत व्यापारी दुकानांच्या भाड्यात वाढ केल्यामुळे आज रविवार दि.०५ मार्च २०२३ रोजी सकाळी या अन्यायकारक भाडेवाढ प्रकरणी पुर्णा/पालम/गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची त्यांच्या गंगाखेड येथील निवासस्थानी भेट घेतली.

पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बि.आर.देसाई व कृषी उत्पन्न समिती प्रशासनाने आडत व्यापाऱ्यांशी सल्लामसलत न करता आडत दुकानांच्या भाड्यात अन्यायकारक वाढ केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जातीने लक्ष घालून आडत व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा याकरिता जेष्ठ आडत व्यापारी जब्बार थारा व आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदानी यांच्या नेतृत्वाखाली आडत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज रविवार दि.०५ मार्च रोजी आमदार गुट्टे यांची भेट घेतली व या संदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत आमदार गुट्टे यांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून या जाचक भाडेवाढ प्रकरणावर योग्य तोडगा काढण्याचा आश्वासन दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या