🌟पुर्णा रेल्वे स्थानकावरील नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवासी वर्गाची प्रचंड हेळसांड...!


🌟महत्वाच्या रेल्वे प्लाटफॉर्मवर जाणीवपूर्वक उभ्या केल्या जाताय मालगाड्या : अपंग वयोवृध्द महिला प्रवासी त्रस्त्र🌟

पुर्णा (दि.१६ मार्च) - मराठवाड्यातील सर्वात महत्वाचे व सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावरून चोवीस तासाच्या कालावधीत तब्बल चाळीस प्रवासी साप्ताहीक/विशेष एक्सप्रेस/पेसेंजर रेल्वे गाड्या धावतात तर मालवाहतुक करणाऱ्या अंदाजे पंचवीस ते तिस गाड्या धावतात परंतु गाड्यांचे नियोजन योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड गोंधळ माजतांना दिसत असून ज्या महत्वाच्या रेल्वे प्लाटफॉर्मवर प्रवासी रेल्वे गाड्या थांबवायला हव्यात त्या प्लाटफॉर्मवर जाणीवपूर्वक मालवाहतूक करणाऱ्या गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे महिला/अबालवृध्द/अपंग प्रवासी वर्गाची अक्षरशः धावपळ होत असून प्लाटफाम बदलतांना धावपळीत महिला अबालवृध्द तसेच अपंग प्रवास्यांना जिव धोक्यात घालावा लागत आहे.


पुर्णा रेल्वे स्थानकाच्या नियोजनाची सर्वस्वी जवाबदारी असलेले  स्टेशन मास्टर शेख अख्तर पाशा यांच्या नियोजनशुन्य कारभाराचा फटका प्रवासी वर्गाला सातत्याने सहन करावा लागत आहे येथील रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रेल्वे प्रवाश्यांची सातत्याने गैरसोय केली जात असल्याचे दिसून येत आहे रेल्वेच्या महत्वाच्या रेल्वे प्लाटफॉर्मवर मालवाहतूक करणाऱ्या गाड्या तासनतास उभ्या करण्यात येत असून प्रवासी गाड्यांना प्लाटफॉर्मवर जागा उपलब्ध नसल्यामुळे या प्रवासी गाड्याना रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेरच उभे करून ठेवण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसत असून अशीच घटना मंगळवार दि.१४ मार्च २०२३ रोजी दुपारी ०३:३० वाजता घडली असून प्लॅटफॉर्म नंबर ०१ वरची गाडी प्लॅटफॉर्म नंबर ०४ वर तर प्लॉट नंबर ०४ ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर ०१ वर घेण्यात आली यामुळे प्रवाशांना या रेल्वे स्थानकावरून त्या स्थानकावर धावपळ करावी लागली त्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्म स्थानकावर न बसता रेल्वे पादचारी पुलावर तासनतास उभे राहिल्याचे निदर्शनास आले यावेळी त्यामध्ये अबालवृद्ध/महिला अपंग प्रवाश्यांना आपला जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे या प्रवाशांना रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम करत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आहे.या सर्व गंभीर प्रकाराला सर्वस्वी स्टेशन मास्टर शेख अख्तर शेख पाशाच जवाबदार असल्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या