🌟पुर्णेतील सौ.पुजा कुऱ्हे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडुन पी.एच.डी.प्रदान....!

🌟कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली सौ.पुजा कुऱ्हे यांना पिएचडी🌟


पूर्णा (दि.२९ मार्च) -
अमृत नगर येथील सौ.पुजा कुऱ्हे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडुन पी.एच.डी. कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नगर येथील न्यू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ पुजा गंगाधर कुर्हे शेवाळकर यांनी " मलेरिया विरोधी एजंट म्हणून फायटोकेमिकल्स बायोप्रोस्पेक्टिंग " या विषयावर विद्यापीठातील डॉसंजय दळवी व डॉ.लक्ष्मीकांत कांबळे मार्गदर्शनाखाली शोधनिबंध पूर्ण केला त्यांच्या यशा बद्दल विनायक शेवाळकर,जयश्री शेवाळकर , विकास पळसकर,दिलीप माने,संतोष एकलारे,विशाल कदम,नारायण चौधरी,रूपेश सोनटक्के, प्रशांत कापसे अदीनी अभिनंदन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या