🌟राज्यात मराठवाडा,विदर्भ,उत्तर महाराष्ट्र भागात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार हवामान विभागाचा इशारा.....!


🌟परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा यलो यलो अलर्ट🌟 

भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट दिली आहे. राज्यांत पुन्हा  अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस मागील काही दिवसांपासून पडत आहे. यावेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत.

अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी सध्या गंभीर अडचणीत आहे. देशातील बहुतांश ठिकाणी गेल्या दोन आठवडाभरापासून वारंवार पाऊस पडत आहे. सततच्या हवामानातील बदलांचेही अनपेक्षित परिणाम होतात. मार्च महिन्यात काही ठिकाणी तर थंडीला सामोरे जावं लागत आहे.

* राज्यात या भागात वादळी पावसाचा यलो अलर्ट :-

▪️ मध्य महाराष्ट्र : नंदूरबार,धुळे,जळगाव,नाशिक.

▪️ मराठवाडा : परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर.

▪️ विदर्भ : बुलढाणा,अकोला,अमरावती,वाशीम,यवतमाळ,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली.

दरम्यान पुढील 24 तासांत पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उप-हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि दक्षिण केरळ या उत्तर भारतातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आग्नेय मध्यप्रदेश, महाराष्ट्रामधील विदर्भ, याशिवाय तेलंगणा, किनारी आंध्रप्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये थोडा पाऊस पडू शकतो. गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तर आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या